पुढची रामनवमी नव्या श्रीराम मंदिरात होईल?

पुढची रामनवमी नव्या श्रीराम मंदिरात होईल?

Uttar Pradesh, Aug 04 (ANI): The proposed model of the Ram Temple in Ayodhya on Tuesday. (ANI Photo)

आज देशभरात रामनवमी उत्साहाने साजरी केली जात आहे. पण देशभरातील रामभक्तांना मात्र अयोध्येत राम मंदिर उभारणीचे काम कधी पूर्ण होणार याची उत्सुकता लागून राहिलेली आहे. अयोध्येतील राममंदिराच्या कामाने वेग घेतलेला आहे. तरीपण श्रीरामाचे मंदिर निश्चित मुदत म्हणजे जानेवारी २०२४ पर्यंत किती प्रमाणात बांधून पूर्ण होईल. नवीन मंदिरात रामलल्लाची पूजा कधी करता येईल असे अनेक प्रश्न पडलेले आहेत. याचे कारणही तसेच आहे. अयोध्यतील श्रीरामाचे मंदिर बांधण्याचा सध्याचा वेग बघितला तर हे मंदिर नियोजित वेळेत बांधून पूर्ण होणार असे चित्र सध्या दिसत आहे. तसे झाल्यास सध्या श्रीरामाची मूर्ती जिथे आहे तेथे आज साजरी होणारी राम नवमी शेवटची असेल. पुढच्या वर्षी भव्य राम मंदिरातच ती साजरी होणार असा विश्वास येथील प्रत्येक रामभक्ताला वाटत आहे.

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने जानेवारी २०२४ पर्यंत राम मंदिराचा तळमजला म्हणजेच गर्भगृह पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. म्हणजेच पुढील रामनवमीपूर्वी, मकरसंक्रांतीच्या निमित्ताने, रामलल्लाच्या मूळ जन्मस्थानी म्हणजेच तात्पुरत्या मंदिरातून गर्भगृहात रामलल्लाला विराजमान करता येईल. मंदिराचा गृह मंडपही पूर्ण झाला आहे. गृहमंडपाचा दरवाजा मकराना संगमरवराचा आहे. याच दरवाजातून भाविक दर्शनासाठी दोन रांगेत पुढे जातील. राम मंदिराच्या गर्भगृहाच्या वरच्या भिंतींवर संगमरवरी बसवण्याचे काम सुरू आहे. गर्भगृहाचा दरवाजा ९ फूट उंच आणि १२ फूट रुंद असेल. हा सोन्याचा दरवाजा असेल.

सामान्य भाविकांना गर्भगृहासमोर जाता येणार नाही. या ठिकाणाहून रामलल्लाचे दर्शन घेता येणार आहे. इथून पुढे फक्त पुजारी, राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनाच मूळ गर्भगृहात जाण्याची परवानगी असेल. राम मंदिरात दोन प्रदक्षिणा मार्ग तयार करण्यात येत असून त्यापैकी गर्भगृहाची प्रदक्षिणा मार्ग बनवण्यात आला आहे. तयारी अंतिम टप्प्यात आहे. केवळ पुजारीच गर्भगृहाची प्रदक्षिणा करू शकतील.

गर्भगृहाला चंद्रपूरच्या सागाचा साज
राम मंदिरासाठी देशातील सर्वोत्तम दर्जाचे सागवान लाकूड महाराष्ट्रातील चंद्रपूर येथून जाण्यासाठी पूर्णपणे तयार आहेचंद्रपूरचे सागवान लाकूड हे भारतातील सर्वोत्तम दर्जाचे लाकूड मानले जाते. या लाकडात उत्ताप्रकारे कोरीव काम केले जाऊ शकते. चंद्रपूरच्या जंगलात तेलाचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे या जंगलात १,००० वर्षे वाळवी लागत नाही असे म्हटल्या जाते.

म्हणून चंद्रपूरच्या सागवान लाकडाची निवड
चंद्रपूर हे ठिकाण भगवान श्री रामाचे वडील राजा दशरथ यांचे जन्मस्थान देखील मानले जाते, म्हणून या चंद्रपूरचे सागवान लाकूड भगवान श्री रामासाठी बांधण्यात येत असलेल्या मंदिरात वापरले जात आहे. प्रभू श्री राम वनवासाच्या काळात दंडकारण्यच्या जंगलात आले होते आणि चंद्रपूर आणि आसपासच्या परिसराला दंडकारण्यचे जंगल म्हणतात आणि त्यांनी आपला बहुतेक वनवास दंडकारण्यच्या जंगलात घालवला होता.

Exit mobile version