न्यूज नेशन या वाहिनीचा पत्रकार वाजिद अली याने हिंदू देवीदेवतांवर अत्यंत खालच्या भाषेत ट्विट केल्याबद्दल त्याची या वाहिनीतून हकालपट्टी करण्यात आली आहे. न्यूज नेशनचे अँकर शुभम त्रिपाठी यांनी ट्विट करत वाजिद अलीची हकालपट्टी करण्यात आल्याचे म्हटले आहे.
वाजिद अलीने फेसबुक पेजवर एका व्यक्तीला उत्तर देताना अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरत हिंदू देवीदेवतांचा अवमान केला. त्याची दखल घेत न्यूज नेशनने त्याची हकालपट्टी केली.
सुदर्शन न्यूजशी संबंधित पत्रकार सागर कुमार याने वाजिद अलीची ही पोस्ट व्हायरल केली. त्यात वाजिद अलीने ब्रह्मा, श्रीराम, हनुमान, श्रीगणेश, कालिमाता यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने केली आहेत.
श्रीराम शाकाहारी होते की मासांहारी असा सवाल त्याने उपस्थित केला होता. हनुमानाने सूर्य कसा गिळला, हत्तीची सोंड कशी काय एका माणसाला जोडली गेली, कालिमातेला १२ हात कसे काय असू शकतात, असे प्रश्नही त्याने उपस्थित केले.
त्याच्या या पोस्टनंतर लोकांनी संताप व्यक्त करायला सुरुवात केली. त्याबद्दल न्यूज नेशन ही वाहिनी काय कारवाई करणार असा प्रश्नही लोकांनी विचारला. त्याची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर वाजिद अलीने आपले अकाऊंट हॅक करण्यात आल्याची बतावणी सुरू केली.
हे ही वाचा:
कामावर रुजू व्हा, उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना दिला इशारा
नरेंद्र मोदींच्या भेटीला शरद पवार! नेमकी कशावर चर्चा
अनिल देशमुखांना सीबीआयने घेतलं ताब्यात
हिमाचलचे विद्यार्थीही म्हणणार ‘यदा यदा ही धर्मस्य’
न्यूज नेशनने याची तात्काळ दखल घेत वाजिद अलीची हकालपट्टी केल्याचे जाहीर केले. अँकर शुभम त्रिपाठी यांनी म्हटले आहे की, अशा जिहादी विचारांच्या लोकांची आम्हाला आवश्यकता नाही. पत्रकारितेच्या नावावर हे कलंक आहेत.
ऑप इंडिया या वेबसाईटने वाजिद अलीशी संपर्क केल्यावर तो म्हणाला की, मी प्रत्येक धर्माचा आदर करतो. मी मंदिर तसेच दर्ग्यामध्येही जातो. त्यामुळे माझे अकाऊंट हॅक करून अशा कमेंट करण्यात आल्या आहेत. मी याची सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे.