‘शिवरायांचा आठवावा प्रताप’… ‘न्यूज डंका’च्या दसरा दिवाळी अंकाचे रायगडावर थाटात प्रकाशन

शिवरायांच्या जाज्ज्वल्य इतिहासाला अर्पण केलेला अंक

‘शिवरायांचा आठवावा प्रताप’… ‘न्यूज डंका’च्या दसरा दिवाळी अंकाचे रायगडावर थाटात प्रकाशन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आणि न्यूज डंकाच्या हिंदवी स्वराज अभियानाच्या अंतर्गत शिवरायांच्या देदिप्यमान इतिहासाला वाहिलेल्या ‘न्यूज डंका’च्या यंदाच्या दसरा दिवाळी अंकाचे प्रकाशन स्वराज्याची राजधानी रायगडावर दणक्यात करण्यात आले. बुधवार १६ ऑक्टोबरला ‘न्यूज डंका’च्या संपूर्ण टीमच्या उपस्थितीत हा अंक प्रकाशित करण्यात आला. ‘न्यूज डंका’चे संपादक दिनेश कानजी यांच्या हस्ते तसेच ‘न्यूज डंका’च्या अनेक हितचिंतकांच्या, मित्रपरिवाराच्या उपस्थितीत या अंकाचे प्रकाशन पार पडले.

रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या सिंहासनारुढ प्रतिमेसमोर हा अंक प्रकाशित झाला आणि नंतर शिवाजी महाराजांच्या चरणी हा अंक अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय, जय शिवाजी, जय भवानी अशा घोषणांनी परिसर दणाणून टाकला. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर फुले उधळण्यात आली.

छत्रपती शिवरायांच्या जीवनचरित्राशी संबंधित विविध पैलूंवर अभ्यास करणारे इतिहास संशोधक, इतिहास अभ्यासक यांनी या अंकात लिखाण केले आहे. इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, विक्रमसिंह मोहिते, रघुजीराजे आंग्रे, डॉ. अनुराधा कुलकर्णी, डॉ. अजित आपटे अशा इतिहास संशोधक, अभ्यासक यांनी विविध विषयांचा सखोल वेध या अंकात घेतलेला आहे. शक्तीस्वरूप जिजाऊ, शिवकाळाचा खगोलीय अभ्यास, शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास, सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या शौर्याची आणि करुण शेवटाची कहाणी, शिवरायांची अर्थनीती, छत्रपतींचे आरमार असे वाचनीय लेखांचा संग्रह या अंकात आहे. हा अंक प्रत्येकाने नक्कीच संग्रही ठेवण्यायोग्य आहे.

या अंकाचे मूल्य ५०० रुपये आहे. एकूण १५२ पानांचा हा दस्तावेज आहे. हा अंक तुम्ही विकत घेऊ शकता. अंकाची किंमत खालील बँक खात्यात जमा करून आपण अंक नोंदवू शकता.

Itihas Media

Bank of Baroda

A/c : 22890200000646

ifsc : BARB0POINSU

किंवा 9004850449 या क्रमांकावर GPAY करूनही अंक घेता येईल.

शिवराज्याभिषेकाचे यंदाचे ३५१वे वर्ष आहे, हे लक्षात घेऊन यावेळी न्यूज डंकावर इतिहास संशोधक, अभ्यासक यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यांच्या या मुलाखतींचेच लेखरूपांतरण करण्यात आले. त्यामुळे सविस्तर असा इतिहास लोकांसमोर या अंकाच्या माध्यमातून आलेला आहे.

Exit mobile version