श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्राने शुक्रवारी भाविकांच्या सोयीसाठी मोठा निर्णय घेतला आहे. जेणेकरून मोठी गर्दी असली तरी रामलल्लाचे दर्शन सुलभ होऊ शकेल. तीर्थक्षेत्र विश्वस्तांनी यासाठी सुगम दर्शन आणि विशिष्ट दर्शन अशा दोन श्रेणी तयार केल्या आहेत. या श्रेणीत दर्शनाची सुविधा सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत दोन-दोन तासांच्या सहा वेगवेगळ्या कालावधीत असेल. या श्रेणीचा पास मिळवणाऱ्या भाविकांना बुकिंग स्लॉटच्या ठरवून दिलेल्या वेळेत पोहोचणे अनिवार्य असेल. अन्यथा तो पास लागू होणार नाही. ही व्यवस्था शनिवारपासून लागू होणार आहे.
सुगम दर्शनसाठी ३०० तर विशिष्ट दर्शनासाठी १५० पास असतील. सुगम दर्शनसाठी ३०० पास वितरित केले जातील, त्यातील १५० पासची बुकिंग ऑनलाइन श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या वेबसाइटच्या माध्यमातून होईल. तसेच, १५० पास तीर्थक्षेत्राचे कार्यकारिणी सदस्य व सरकारमधील उच्चाधिकाऱ्यांसाठी ठेवले जातील.
हे ही वाचा:
भारताची ‘यशस्वी’ घौडदौड; तिसऱ्या दिवसाअंती ३२२ धावांची आघाडी
कमल नाथ, नकुल नाथ भाजपात जाणार?
युक्रेनचे अवदिवका शहर रशियाच्या ताब्यात
पुण्येश्वर मंदिर हा पुणेकरांचा अधिकार
सुगम दर्शनाचा कालावधी
सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत
सकाळी नऊ ते ११
दुपारी एक ते तीन
दुपारी तीन ते पाच
संध्याकाळी पाच ते सात
संध्याकाळी सात ते रात्री नऊ
श्रुंगारआरती दर्शनासाठीही पास बनणार
मंगला व शयन आरतीसह श्रुंगार आरतीदर्शनाचाही पास मिळणार आहे. श्रुंगार आरती सकाळी सहा वाजता होते. हा पास असणाऱ्यांना पावणे सहा वाजल्यापासूनच मंदिरात प्रवेश मिळेल. आरतीसाठी १०० भाविकांची व्यवस्था केली जाईल. ज्यातील २० पासची ऑनलाइन बुकिंग होईल तर, ८० पास पदाधिकाऱ्यांसाठी राखीव असतील.