दिगपाल लांजेकर यांचा ‘पावनखिंड’ हा चित्रपट येत्या ३१ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. या बहुचर्चित चित्रपटातील एक भारूड काल म्हणजेच रविवार, ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाले आहे. ‘युगत मांडली’ असे या गाण्याचे शीर्षक आहे. मराठीतील प्रसिद्ध लोकसंगीत प्रकार असलेल्या भारुड या प्रकारातील हे गाणे आहे. अवघ्या काही तासांतच या गाण्याला हजारो लोकांनी पहिले असून हे गाणे लोकांच्या पसंतीस पडताना दिसत आहे.
अवधूत गांधी आणि हरिदास शिंदे यांनी हे भारुड गायले आहे. तर देवदत्त बाजी यांनी हे भारूड संगीतबद्ध केले आहे. विशेष बाब म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांनीच या भारूडाचे लेखन केले आहे. या महिन्याचा आणि २०२१ वर्षाचा अखेरचा दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबर रोजी पावनखिंड हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या नावावरूनच छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी सरदार बाजीप्रभु देशपांडे यांच्यावर हा सिनेमा बेतलेला असल्याचे समजते.
हे ही वाचा:
पाठीवर बॅग आहे?? मग काळजी घ्या…वाचा सविस्तर!
…आणि डॉलरऐवजी त्याला मिळाले कागदाचे तुकडे !
संरक्षण करारासाठी पुतीन आजपासून भारत दौऱ्यावर
शिवमंदिर हटविल्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी
सुरुवातीला हा चित्रपट जंगजौहर या नावाने प्रदर्शित होणार होता. पण नंतर चित्रपटाचे नाव बदलून पावनखिंड असे करण्यात आले. तर आधी हा चित्रपट जून महिन्यात प्रदर्शित होणार होता पण कोवीडच्या दुसऱ्या लाटेत चित्रपटगृहे बंद असल्यामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, क्षिती जोग, हरीश दुधाडे, अजय पुरकर असे नामवंत कलाकार पाहायला मिळणार आहेत.