समाज माध्यमांवर सध्या नेस्ले कंपनी चांगलीच चर्चेत आहे. कंपनीने चॉकलेटवर लावलेल्या रॅपरमुळे ही कंपनी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. नेस्लेने किटकॅट चॉकलेटच्या रॅपरवर भगवान जगन्नाथाचे चित्र लावले आहे. हा प्रकार समोर येताच नेस्ले विरुद्ध संतप्त प्रतिक्रिया लोकांनी देण्यास सुरुवात केली आहे.
कंपनीने प्रमोशनसाठी चॉकलेटच्या रॅपरवर भगवान जगन्नाथाचे चित्र लावले. हे पाहून लोकांनी नाराजी व्यक्त केली असून अशा जाहिरातींमुळे भावना दुखावल्या जात असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. अहवालानुसार, कंपनीने गेल्या वर्षी आपल्या चॉकलेट रॅपरवर भगवान जगन्नाथ, माता सुभद्रा आणि बलभद्र यांचे फोटो वापरले होते. रॅपरवर असलेल्या चहाच्या किटलीच्या चित्रात हे फोटो असून लोकांनी यावर आक्षेप घेतला आहे. त्यानंतर लोकांनी हे चित्र रॅपरवरून हटवण्याची मागणी केली.
हे ही वाचा:
धक्कादायक! माजी सरपंचाने गर्भवती वनरक्षकाला केली मारहाण
वैद्यकीय अभ्यासक्रमात २७ टक्के ओबीसी आरक्षणाला ‘सर्वोच्च’ पाठिंबा
‘१९९३च्या बॉम्बस्फोटातील आरोपी पाकिस्तानचे होते पाहुणे’
विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून पुन्हा शाळा सुरू
चॉकलेट खाल्यानंतर लोक रॅपर डस्टबिन किंवा रस्त्यावर टाकतात. तो देवाचा अपमान होईल, असे स्पष्टीकरण लोकांनी दिले आहे. हे प्रकरण तापल्यानंतर नेस्ले कंपनीने यावर स्पष्टीकरण दिले आहे. आमचा हेतू कोणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता आणि नाही, असे कंपनीचे म्हणणे आहे. या वादानंतर संबंधित रॅपर बाजारातून काढून घेण्यास सुरुवात केली असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.