मंगळवार, २९ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाच्या अंतर्गत भारताची राजधानी दिल्लीत असलेल्या नेहरू संग्रहालयाचे नाव बदलले जाणार आहे. हे नाव आता प्रधानमंत्री संग्रहालय असेल. पुढील महिन्यात १४ एप्रिल म्हणजेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिवशी या संग्रहालयाचे उद्घाटन केले जाणार आहे.
मोदी सरकारच्या या निर्णयामुळे भारत देशात होऊन गेलेल्या आजवरच्या सर्व प्रधानमंत्र्यांच्या आठवणींचे जतन होणार आहे. आत्तापर्यंत नेहरू संग्रहालयात केवळ भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याच आठवणींचा संग्रह होता. पण आता भारताच्या इतिहासात आजवर झालेल्या चौदा प्रधानमंत्र्यांशी संबंधित सर्व आठवणींच्या नोंदी या वस्तुसंग्रहालयात असणार आहेत. त्यामुळे आजवर भारताला होऊन गेलेल्या सर्व पंतप्रधानांच्या आठवणींना एक हक्काचे स्थान मिळणार आहे.
हे ही वाचा:
मोहित कंबोज यांची मागणी; मशिदींवर बेकायदेशीर भोंगे हटवा!
१ मे पासून कार्यान्वित होणार भारत-युएई मधील हा विशेष करार!
प्रवीण दरेकरांना पुन्हा दोन आठवड्यांचा दिलासा!
पालिकेची पलटी; नारायण राणेंच्या अधीश बंगल्याला दिलेली नोटीस घेतली मागे
१४ एप्रिल रोजी सरकार मार्फत प्रधानमंत्री संग्रहालया सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने एका संग्रहालयाचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारची ही खासियत राहिली आहे की त्यांनी सत्तेत येताच योजनांची नावे ही व्यक्ती वरून ठेवण्याऐवजी त्याला प्रधानमंत्री योजना असे म्हणायला सुरुवात केली. पदावरील व्यक्ती पेक्षा त्या पदाचे महत्त्व अधिक आहे हा विचार या कृतीतून अधोरेखित होतो.