राष्ट्रवादीचे औरंगजेब प्रेम पुन्हा जागृत

औरंगजेबाच्या महालाची दुरुस्ती करण्याचे आवाहन

राष्ट्रवादीचे औरंगजेब प्रेम पुन्हा जागृत

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे औरंगजेबाच्या बाबतीतील अनेक विधाने अजून ताजी असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे औरंगाबादमधील औरंगजेबाच्या एका महालाच्या संवर्धनाची मागणी करण्यात आली आहे. त्याबद्दल लोकांमध्ये आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष इलियास किरमाणी यांनी औरंगाबादचे जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून औरंगजेबाच्या किला ए अर्क या महालाच्या संवर्धनाची मागणी करण्यात आली आहे.

या पत्रात म्हटले आहे की, किला ए अर्क हा मुघल शासक औरंगजेबाने १६५० मध्ये बांधला होता. तो राजवाडा आता जीर्ण अवस्थेत आहे. त्याचे बरेच नुकसान झाले असून त्या महालाचे गतवैभव नाहिसे झाले आहे. या परिसरात शाही मस्जिद, आदिल दरवाजा, झेबुन्निसा महल, पाल्मार कोठी, जनाना महाल, जनाना मस्जिद, मर्दाना महाल यांचा समावेश आहे. किला ए अर्कमध्ये आलिशान महाल, सुंदर मुघल गार्डनचे अवशेष, राज सिंहासनाची जागा, दिवान ए आम व दिवान ए खासची जागा, मंत्र्यांचे दालन, शयनकक्ष व हमामखानाचे अवशेष दिसतात. जी-२०च्या अंतर्गत शहराच्या सुशोभिकरणामध्ये व स्मार्ट सिटीमध्ये किले अर्कचा समावेश करण्यात यावा. एकेकाळी असलेल्या या सुंदर वास्तूचे संवर्धन व्हावे. तसे संवर्धन झाले तर त्यामुळे शहरासाठी ते एक पर्यटन स्थळ बनेल. त्यातून आर्थिक उत्पन्न मिळू शकेल.

हे ही वाचा:

शिवरायांचा अमेरिकेतील एकमेव पुतळा चोरीला

इल़ॉन मस्कने केला तर चमत्कार अदाणींनी केला तर बलात्कार?

तुर्कीचा गोलरक्षक तुर्कस्लान भूकंपात मृत्युमुखी

नाणार होणार, ठाकरे गटाचे काय जाणार?

या पत्राची प्रत पालिका आयुक्त, स्मार्ट सिटी प्रकल्पाचे संचालक, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे संचालक यांना पाठविण्यात आली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबाबद्दल अजब विधान केले होते. औरंगजेबाने संभाजी महाराजांना जिथे मारले तिथे विष्णू मंदिरही होते पण तो जर हिंदू द्वेष्टा असता तर त्याने ते मंदिरही तोडले असते असे आव्हाड म्हणाले. नंतर मात्र औरंगजेब क्रूर होता असे विधान करत आव्हाड यांनी सारवासारवही केली होती. समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेब हा चांगला राजा असल्याचे म्हटले होते. आता या नव्या मागणीमुळे लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

Exit mobile version