नवरात्र २०२२ : कामाख्या मंदिराचे तेजच निराळे

महाराष्ट्रात जेव्हा सत्तांतर झाले त्याआधी आमदार ज्या कामाख्या मंदिरात गेले होते ते हेच मंदिर. आसाम राज्यातील कामाख्या मंदिर हे मोठे जागृत देवस्थान मानले जाते.

नवरात्र २०२२ : कामाख्या मंदिराचे तेजच निराळे

सध्या देशभरात शारदीय नवरात्री उत्सव साजरा केला जात आहे. आसाममधील गुवाहाटी येथे स्थित ५१ शक्तीपीठांपैकी एक कामाख्या शक्तीपीठ अतिशय प्रसिद्ध आणि चमत्कारी आहे. यामुळेच नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने देवीच्या मंदिरात भक्तांची गर्दी होत आहे. ग्रंथानुसार देवी सतीसाठी असलेला महादेवाचा मोह भंग करण्यासाठी भगवान विष्णू यांनी आपल्या सुदर्शन चक्राने देवी सतीच्या मृत शरीराचे ५१ भाग केले होते. ज्या-ज्या ठिकाणी देवी सतीच्या शरीराचे अवयव पडले, ते शक्तीपीठ रुपात प्रसिद्ध झाले आहेत.

महाराष्ट्रात जेव्हा सत्तांतर झाले त्याआधी आमदार ज्या कामाख्या मंदिरात गेले होते ते हेच मंदिर. आसाम राज्यातील कामाख्या मंदिर हे मोठे जागृत देवस्थान मानले जाते. कामाख्या देवीची कथा अशी सांगितली जाते की, सती देवीने स्वत्याग केल्यानंतर भगवान शंकर क्रोधीत झाले. रागाने त्यांनी तांडव नृत्य करायला सुरुवात केली. हे पाहून भगवान विष्णू यांनी सतीच्या शरीराचे ५१ तुकडे केले व हे तुकडे भारतवर्षात विविध ठिकाणी पडले. हे ५१ तुकडे ज्या ठिकाणी पडले त्यांना शक्तिपीठे म्हणतात. गुवाहाटी पासून आठ किमी दूर कामागिरी किंवा नीलाचल पर्वतावर सतीचा योनी भाग पडला. तिथे आज हे कामाख्या मंदिर उभे आहे. तांत्रिकांची देवी कामाख्या देवीची पूजा, भगवान शिवची नववधू म्हणून केली जाते, जी मुक्ति प्रदान करते. कामाख्या माता काली आणि त्रिपुरा सुंदरी देवी नंतर तांत्रिकांची सर्वात महत्वाची देवता आहे.

कामाख्या मंदिर

कामाख्या मंदिर तीन भागात बनवले आहे. पहिला भाग हा सर्वात मोठा आहे. या पहिल्या भागात प्रत्येकाला जाण्याची परवानगी नाही. दुसऱ्या भागात देवी असून, येथे दर्शन घेतले जाते. विशेष म्हणजे इथे दगडातून सतत पाणी वाहत असते. असे मानले जाते की, कामाख्या देवीला मासिक पाळी ही महिन्यातील तीन दिवस येते त्यावेळी तीन दिवस मंदिराचे दरवाजे बंद असतात. तीन दिवसांनी पुन्हा जल्लोषात देवीचे दरवाजे उघडले जातात. तंत्र साधनेसाठी हे ठिकाणी सर्वात महत्वाचे मानले जाते. तसेच इथे साधूंची वर्दळही असते. येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या अडचणी दूर होतत, अशी भक्तांची श्रद्धा आहे.

मंदिरात नाही देवीची मूर्ती

कामाख्या देवीच्या मंदिरात देवीची कोणतीही मूर्ती नाही. येथे देवीच्या योनी भागाचीच पूजा केली जाते. मंदिरातील एक कुंड नेहमी फुलांनी झाकून ठेवलेले असते. येथून जवळच एका ठिकाणी देवीची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. हे पीठ देवीच्या इतर सर्व पीठामध्ये महापीठ मानले जाते.

हे ही वाचा:

ममता बॅनर्जी खेळल्या रिंगणाबाहेरचा गरबा

मुंबई विमानतळावर महिलेकडून कोकेन जप्त

काँग्रेसचा अध्यक्ष, अध्यक्ष खेळ सुरूच

ग्राहकांनो आता वर्षभरात मिळणार एवढेच सिलिंडर

या मंदिरात एक वेगळ्याच प्रकारचा प्रसाद दिला जातो. प्रसाद म्हणून भक्तांना ओले कापड दिले जाते, त्या कापडाला अंबुबाची कापड म्हणतात. जेव्हा देवीला तीन दिवस मासिक पाळी येते तेव्हा तिच्या मुर्तीभोवती पांढरे वस्त्र पसरवले जाते. तीन दिवसांनी जेव्हा मंदिराचे दरवाजे उघडले जातात तेव्हा हे पांढरे कापड लाल रंगात भिजलेले असते. नंतर हेच कापड प्रसाद म्हणून भाविकांना दिले जाते.

Exit mobile version