आजपासून देशभर शारदीय नवरात्राला सुरुवात झाली आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजया दशमी अशा नऊ रात्री होणारा शक्तीचा जागर सुरु होत आहे. तर दुसरीकडे आजपासूनच महाराष्ट्रातील मंदिरे ही भाविकांसाठी खुली होत आहेत. त्यामुळे भाविकांच्या मनात उत्साह आहे. राज्यातील विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली आहे.
आज देशभर नवरात्रीचे घट बसत आहेत. शक्तीचे प्रतीक असणाऱ्या या देवीच्या उत्सवाचा उत्साह देशभर पाहायला मिळत आहे. नवरात्र म्हंटले की आठवतात गरबा, दांडिया, भोंडला, हे सर्व मनोरंजनाचे कार्यक्रम. गेल्या वर्षी कोरोनाच्या सावटामुळे हे कार्यक्रम कुठेच पहायला मिळाले नव्हते. पण आता कमी प्रमाणात का होईना पण कोरोना नियमावलीचे पालन करून हे कार्यक्रम पाहायला मिळणार आहेत.
हे ही वाचा:
तुम्ही माझ्या वडिलांना कधीही मारू शकत नाही
NCB वर निशाणा साधण्यासाठी नबाब मलिकना ड्रग्ज माफीयांनी सुपारी दिली आहे काय?
‘शीख हत्यांकाडास जबाबदार असणाऱ्यांची सहानुभूती नको!’
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुन्हा भाजपाच नंबर १
नवरात्रीत भक्तिभावाने केले जाणारे देवीच्या उपवासाचेही विशेष महत्व आहे. त्यामुळे आजपासून म्हणजेच ७ ऑक्टोबर पासून ते १५ ऑक्टोबर पर्यंत देशभर हा देविभक्तीचा सोहळा पाहायला मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून सर्व देशवासियांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “येणारे दिवस हे जगत जननी मातेच्या भक्तीत लीन होण्याचे आहेत. हे नवरात्र आपल्या सर्वांच्या आयुष्यात शक्ती, उत्तम आरोग्य आणि भरभराट घेऊन येवो.” असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.