नरेंद्र मोदींनी रामलल्लाच्या सूर्य टिळक अभिषेकाचे विमानातून घेतलं दर्शन

बसल्याजागी पायातले बूट बाजूला काढत टॅबमधून अनुभवले दर्शन

नरेंद्र मोदींनी रामलल्लाच्या सूर्य टिळक अभिषेकाचे विमानातून घेतलं दर्शन

देशभरात बुधवार, १७ एप्रिल रोजी रामनवमीचा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. विशेष म्हणजे अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीनंतर प्रभू श्री रामांची ही पहिलीच रामनवमी आहे. या शुभ दिनी अयोध्येतील राम मंदिरात राज्याभिषेक झाला तसेच दुपारी १२ वाजता रामललाचे सूर्य तिलक करण्यात आले. सारा देश या नयनरम्य दृश्याचा साक्षीदार झाला आहे. खास तंत्रज्ञानाच्या मदतीने सूर्यकिरणे रामललाच्या कपाळाच्या बरोबर मधोमध पडल्याचे दिसून आले.

विशेष म्हणजे राम मंदिरात जेव्हा रामलल्लाचा सूर्य टिळक सोहळा होत होता, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाममधील नलबारी येथे एका जाहीर सभेला संबोधित करत होते. पण, जाहीर सभेला संबोधित केल्यानंतर लगेचच नरेंद्र मोदींनी त्यांच्या टॅबमध्ये अयोध्येतील राम लल्लाचे ऑनलाईन दर्शन घेतले. स्वतः नरेंद्र मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करून ही माहिती आणि फोटो शेअर केला आहे.

नरेंद्र मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “नलबारी सभेनंतर मला अयोध्येत रामलल्लाच्या सूर्य टिळकांचा अद्भुत आणि अनोखा क्षण पाहण्याचे भाग्य मिळाले. श्री रामजन्मभूमीचा हा बहुप्रतिक्षित क्षण सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे. हे सूर्य टिळक विकसित भारताच्या प्रत्येक संकल्पाला आपल्या दैवी उर्जेने अशा प्रकारे उजळून टाकतील.” अयोध्येत प्रभू श्रीरामांना सूर्य तिलक अभिषेक होत असताना नरेंद्र मोदींनी विमानातच पायातले बूट काढून ठेवल्याचे दिसून आले. त्यांनी त्यांच्या टॅबमध्ये रामलल्लाचे दर्शन घेतले आणि त्यांना नमस्कार केला.

हे ही वाचा.. 

राहुल गांधी अन प्रियंका हे ‘अमूल बेबीज’!

जॉस बटलरच्या वादळात केकेआर गारद!

युपीएससी परीक्षेत बॅडमिंटनपटू कुहू गर्गने मारले मैदान 

टी-२० विश्वचषकात रोहित-विराट करणार सलामीला

रामनवमीच्या मुहूर्तावर बुधवारी अयोध्येत आरसे आणि भिंगांचा समावेश असलेल्या विस्तृत यंत्रणेद्वारे रामललाचे ‘सूर्य टिळक’ करण्यात आले. या यंत्राद्वारे सूर्याची किरणे रामाच्या मूर्तीच्या कपाळापर्यंत पोहोचली. २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या नवीन मंदिरातील राम मूर्तीच्या अभिषेकानंतर ही पहिली रामनवमी आहे.

Exit mobile version