आर्या आबंकेर – सुरेश वाडकरांनी गायलेल्या ‘हृदय में श्रीराम’ गाण्याची मोदींनी घेतली दखल

‘एक्स’ अकाऊंटवर गाणे त्यांनी शेअर करत केले कौतुक

आर्या आबंकेर – सुरेश वाडकरांनी गायलेल्या ‘हृदय में श्रीराम’ गाण्याची मोदींनी घेतली दखल

अयोध्येत २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. संपूर्ण देशाला या सोहळ्याची उत्सुकता लागली असून संपूर्ण वातावरण राममय झाले आहे. या सोहळ्यासाठी प्रत्य्रेक रामभक्त आपापल्या परीने यात योगदान देत आहे. अशातच अनेक गायक- संगीतकार या सोहळ्यानिमित्ताने श्रीरामाला समर्पित गाणं लोकांच्या भेटीला आणत आहेत. असेच एक गीत सध्या चर्चेत आले आहे.

श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या शुभप्रसंगी संगीतकार सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेले आणि कवी संदीप खरे यांनी लिहिलेले ‘हृदय में श्रीराम है’ हे भक्ती गीत भाविकांच्या भेटीला आले आहे. सुप्रसिद्ध गायक पद्मश्री सुरेश वाडकर आणि गायिका आर्या आंबेकर यांनी हे गीत गायले आहे. विशेष म्हणजे याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. आपल्या ‘एक्स’ अकाऊंटवर हे गाणे त्यांनी शेअर केले आहे.

नरेंद्र मोदी यांनी लिहिले आहे की, “अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण देश भगवान श्रीरामाच्या भक्तीच्या रंगात रंगला आहे. सुरेश वाडेकर आणि आर्या आंबेकर यांनी त्यांच्या मधुर सुरांमध्ये ही भावना व्यक्त केली आहे.” असं म्हणत नरेंद्र मोदींनी आर्या आबंकेर – सुरेश वाडकर यांनी गायलेल्या ‘हृदय में श्रीराम’ गाण्याची लिंक शेअर केली आहे.

हे ही वाचा:

ट्रेनमध्ये तिकीट परीक्षकाकडून प्रवाशाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निलंबित!

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवीसह पत्नी आणि मुलावर गुन्हा दाखल!

भारत जोडो न्याय यात्रेचं अखिलेश यादवांना आमंत्रण नाही; स्वतःची पदयात्रा सुरू करणार

आदिवासी विकास विभाग कार्यालयाबाहेर आंदोलन, आत साहेबांचा ‘बड्डे’!

यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हे गाणं त्यांच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर केलं आहे. “श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या शुभ प्रसंगी, संगीतकार सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेले व कवी संदीप खरे यांनी लिहिलेले ‘हृदय में श्रीराम है’ हे भक्ती गीत अतिशय हृदयस्पर्शी आहे. सुप्रसिद्ध गायक पद्मश्री सुरेश वाडकर आणि गायिका आर्या आंबेकर यांनी गायलेले गीत अत्यंत भक्तिमय असून ते ऐकताना एक सुखद अनुभव येतो. संपूर्ण टीम ला माझा जय श्रीराम! सर्वांनी जरूर ऐकावे.” अशी पोस्ट देवेंद्र फडणवीस यांनी लिहून या गाण्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Exit mobile version