उत्तर प्रदेश मधील रस्त्यांची किंवा शहरांची नावे बदलण्याची परंपरा काही नवीन नाही. अशातच आता उत्तर प्रदेशातील आणखीन एका प्रसिद्ध रस्त्याचे नाव बदलण्यात आले आहे. आग्रा येथील घटिया आजम खान रस्त्याचे नामांतर विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक सिंघल यांच्या नावे करण्यात आले आहे. आता हा रस्ता अशोक सिंघल पथ या नावाने ओळखला जाणार आहे.
रविवार १९, डिसेंबर रोजी या नामांतरावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून आग्र्यातील प्रसिद्ध घटिया आझम खान रस्त्याचे नामांतर करणार असल्याच्या चर्चा रंगताना दिसत होत्या. तर या संदर्भात आता सरकारी पातळीवरून अधिकृत निर्णय घेण्यात आला आहे.
आग्राचे महापौर नवीन जैन हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘भारताच्या गुलामगिरीच्या कालखंडातील गोष्टींचे नामांतर करण्याच्या प्रक्रियेतील हा एक भाग असून भविष्यातही ही प्रक्रिया अशीच सुरू राहील’ असे महापौर नवीन जैन यांनी सांगितले.
हे ही वाचा:
माफी मागितली! आता पुन्हा बडबड सुरू…
तुकाराम सुपेंच्या घरातून २ कोटी जप्त
हेमा मालिनी म्हणतात, अयोध्या, काशीनंतर मथुरा
विश्व हिंदू परिषदेचे दिवंगत नेते स्वर्गीय अशोक सिंघल हे देशातील एक मोठे नाव असून घटिया आजम खान रस्त्यावर असलेल्या एका घरात त्यांचा जन्म झाला होता. त्यामुळेच त्यांच्या सन्मानार्थ या रस्त्याचे नाव बदलून अशोक सिंघल पथ असे करण्यात आले आहे. दरम्यान याद आधी २६ नोव्हेंबर रोजी आग्रा येथील मुघल रस्त्याचे नाव बदलून महाराज अग्रसेन पथ असे करण्यात आले होते.