मुसलमानांनी काशी आणि मथुरा ही तीर्थस्थळे हिंदूंना द्यावीत, असं महत्त्वाचं विधान पुरातत्व शास्त्रज्ञ के के मोहम्मद यांनी केले आहे. बाबरी मशिदीच्या ठिकाणी उत्खननाच्या वेळी के के मोहम्मद यांनी महत्त्वाचे निष्कर्ष नोंदवले होते. यानंतर त्यांनी आता काशी आणि मथुराबाबत सुरू असलेल्या वादावर हे महत्त्वपूर्ण विधान केले आहे. काशी आणि मथुरा ही ठिकाणे हिंदूंच्या ताब्यात द्यावीत, कारण या ठिकाणांवर हिंदूंची अगाध श्रद्धा आहे, असे ते म्हणाले. ‘हिंदुस्तान पोस्ट’ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
के के मोहम्मद यांनी बाबरीचे उत्खनन करून रामजन्मभूमी मंदिराबाबत महत्त्वाचे निष्कर्ष काढले होते. शिवाय त्या ठिकाणी एक प्राचीन मंदिर असल्याचेही सांगितले होते. त्यांनी एका कार्यक्रमात म्हटले की, “मुस्लिमांनी काशी ज्ञानवापी आणि मथुरा श्रीकृष्णजन्मभूमी हिंदूंच्या ताब्यात द्यावे. भारत आज धर्मनिरपेक्ष आहे, तो हिंदूंमुळेच आहे. येथे हिंदू बहुसंख्य आहेत, त्यामुळे देश धर्मनिरपेक्ष आहे. मुस्लीम बहुसंख्य असते तर भारताची धर्मनिरपेक्षता टिकवणे कठीण झाले असते. स्वातंत्र्यानंतर मुस्लिमांसाठी पाकिस्तानची निर्मिती करण्यात आली, तर हिंदूंना भारत देण्यात आला, तरीही हिंदूंनी तो हिंदू देश बनवला नाही, तो धर्मनिरपेक्ष ठेवला आणि त्यासाठी मुस्लिमांनी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे,” असं महत्त्वाचे विधान त्यांनी केले.
ज्ञानवापी आणि शाही इदगाह मशीद हिंदूंच्या ताब्यात देण्याची सूचना मोहम्मद आणि केली आहे. सर्व धर्मगुरूंनी एकत्र येऊन या वास्तू हिंदू समाजाच्या ताब्यात द्याव्यात, कारण काशी, मथुरा आणि अयोध्या हिंदूंसाठी विशेष महत्त्वाच्या आहेत. मुस्लिमांना या ठिकाणांशी संलग्न असलेल्या मशिदींशी कोणतीही भावनिक ओढ नाही, असेत्यांनी स्पष्ट केले. वाराणसीतील श्री काशी विश्वनाथ मंदिर- ज्ञानवापी प्रकरण आणि मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमी- शाही ईदगाह मशीद प्रकरणाची सुनावणी सुरू असून या वादांमध्ये के के मोहम्मद यांचे हे विधान आता चर्चेचा विषय बनले आहे.
हे ही वाचा :
धक्कादायक! शाळेच्या भरभराटीसाठी शाळा संचालकांनीच घेतला नरबळी
“महिलेला कुणी जाणीवपूर्वक पाठविले असेल तर पाहून घेऊ”
हरियाणा काँग्रेसने आपल्या १३ नेत्यांना दाखवला बाहेरचा रस्ता
बांगलादेशी पॉर्नस्टार उल्हासनगरात, पोलिसांकडून अटक
के के मोहम्मद यांनी राम मंदिर- बाबरी मशीद वादात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांना बाबरी मशिदीच्या पश्चिमेकडील भागात एका प्राचीन मंदिराचे अवशेष सापडले होते. ते अवशेष गुर्जरा- प्रतिहार घराण्याने १० व्या ते ११ व्या शतकात बांधले असल्याचे त्यांनी सांगितले होते.