एका रेल्वेत लोकांची जिथून ये-जा असते त्या मार्गिकेतच नमाज पढताना काही मुस्लिम दिसत असल्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल झाला आहे. हा व्हीडिओ भाजपाचे माजी आमदार दीपलाल भारती यांनी काढला आहे.
नमाज अदा करत असल्यामुळे लोकांना तिथून ये-जा करणे मुश्किल झाले आहे. नमाज अदा करेपर्यंत कुणालाही त्या जागेतून पुढे जाता येत नव्हते. स्वतः दीपलाल हे त्या गाडीत असल्यामुळे त्यांनी हा व्हीडिओ काढला.
सत्याग्रह एक्स्प्रेस ट्रेन क्रमांक १५२७३मध्ये हा प्रकार घडल्याचे दीपलाल यांनी म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वी दीपलाल यांनी हा व्हीडिओ काढला होता आणि आता तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यावरून या नमाज पढणाऱ्यांवर टीकाही होत आहे. रेल्वेत जाण्यायेण्याच्या मार्गातच नमाज पढणे योग्य नाही, अशा अर्थाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
Watch| Muslim men offering Namaz in the corridor of a train parked at a railway station in Uttar Pradesh’s Kushinagar.
The Railway Protection Force (RPF) has said to get the video probed. Former BJP MLA Deeplal Bharti has made this video. pic.twitter.com/nOEfVsdqbM
— Organiser Weekly (@eOrganiser) October 22, 2022
खड्डा रेल्वे स्टेशनला रेल्वेच्या आतच हे सगळे नमाज अदा करत होते. त्यामुळे लोकांना येणे जाणे अशक्य झाले होते. एकप्रकारे त्यांना नमाजाच्या माध्यमातून रोखण्यातच आले होते. या लोकांनी खाली चादर अंथरून तिथे नमाज अदा करण्यास सुरुवात केली.
हे ही वाचा:
जॅकलिनचा अंतरिम जामीन १० नोव्हेंबरपर्यंत वाढवला
लक्ष लक्ष दिव्यांनी अयोध्यानगरी उजळणार
जिंताओ यांना पक्षाच्या बैठकीतून जबरदस्तीने बाहेर काढले, पंतप्रधानांचीही हकालपट्टी
अखेर उद्धव ठाकरे घराबाहेर पडणार; २३ ऑक्टोबरला संभाजीनगरची भेट
ही सत्याग्रह एक्स्प्रेस रक्सोलपासून आनंद विहार या मार्गावर चालते. त्यात नेहमीच प्रचंड गर्दी असते. तिथून ती खड्डा रेल्वे स्टेशनला पोहोचते. कुशीनगर जिल्ह्यात हे खड्डा स्टेशन येते.
अशा प्रकारच्या घटना अनेक ठिकाणी घडलेल्या पाहायला मिळतात. विशेषतः सार्वजनिक ठिकाणी मिळेल त्या जागी नमाज पढताना मुस्लिम दिसतात. मागे मुंबईतही एका धावत्या रेल्वेमध्ये सीटवर बसून एकजण नमाज पढत असल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. प्लॅटफॉर्म, पुलावरही नमाज पढत असल्याचेही प्रकार घडले आहेत. त्यावरून टीका होत असते.