बँकेत ओळख पटवण्यासाठी हिजाब हटविण्यास मुस्लीम विद्यार्थिनीचा नकार   

बँकेत ओळख पटवण्यासाठी हिजाब हटविण्यास मुस्लीम विद्यार्थिनीचा नकार   

कर्नाटकमधील वादाचे पडसाद आता देशभर उमटू लागले असून याच संदर्भातील एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. बिहारमधील हा व्हिडिओ असून बेगुसराय जिल्ह्यातील म्हैसूर चौकात असलेल्या UCO बँकेमधील आहे. शमा तबस्सुम नावाची विद्यार्थिनी पैसे काढण्यासाठी गेली असता तिची सही जुळत नसल्याने तिला हिजाब काढण्यास सांगण्यात आले. त्यावरून या मुलीने बँक कर्मचाऱ्यांशी वाद उकरून काढला.

या मुलीला केवळ ओळख पटवण्यासाठी हिजाब काढण्यास सांगितले. तेव्हा या मुलीने वाद घालून तिच्या वडिलांना आणि भावाला बँकेत बोलावून घेतले. त्यानंतर या मुलीने आणि तिच्या कुटुंबियांनी या वादाला कर्नाटकमधील हिजाब वादाशी जोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात नेण्याची धमकीही दिली. तसेच वादाचा व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल करण्याची धमकी दिली. मुलीचे वडिलही बँक कर्मचाऱ्यांना धमकावताना दिसून येत आहे.

हा कर्मचारी कर्नाटकातून आल्याचे मुलीचे वडील सांगत आहेत. या बँकेतून आमचे व्यवहार व्हायचे आधी काही अडचण नव्हती, आता हे लोक आता हिजाब उतरवायला सांगत आहेत, असे ते बोलत आहेत.

हे ही वाचा:

‘हिजाब वाद हा इस्लामिक स्टेटच्या दिशेने पहिले पाऊल आहे’

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये दोन दहशतवादी अटकेत

‘संजय राऊत यांच्याकडे एवढी संपत्ती कुठून आली?’

भीमा-कोरेगाव आयोगाने पवारांची केली तासभर चौकशी!

बँकेचे व्यवस्थापक रितेश कुमार यांनी सांगितले की, मुलीची सही जुळत नसल्यामुळे कर्मचाऱ्याने या मुलीला हिजाब काढण्यास सांगितले. तिची ओळख पटावी यासाठीच असे सांगण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आमचा हिजाबशी काहीही संबंध नाही, असेही ते म्हणाले.

Exit mobile version