पश्चिम बंगालमधील शिल्पकारांनी साकारली अयोध्येच्या राम लल्लाची मूर्ती

रामाच्या मूर्ती बनवल्याचा मला आनंद,मूर्तिकार मोहम्मद जमालुद्दीन

पश्चिम बंगालमधील शिल्पकारांनी साकारली अयोध्येच्या राम लल्लाची मूर्ती

पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील दोन मुस्लिम शिल्पकारांनी उत्तर प्रदेशातील अयोध्येतील राम मंदिराच्या आगामी भव्य उद्घाटनासाठी भगवान रामाच्या मूर्ती तयार केल्या आहेत. शिल्पकार मोहम्मद जमालुद्दीन आणि त्यांचा मुलगा बिट्टू हे भव्य पुतळे बनवण्यासाठी आपल्या कामात गुंतले आहेत.या पिता-पुत्राचे काम प्रथमच ऑनलाइन पाहण्यात आले. त्यामुळे त्यांना अयोध्येतून रामाच्या मूर्ती बनवण्याचा आदेश आला.

‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, जमालुद्दीन म्हणाले की, मातीच्या मूर्तींपेक्षा फायबरच्या मूर्तींची किंमत जास्त आहे. परंतु फायबरच्या मूर्ती सर्व प्रकारच्या हवामानाचा सामना करू शकतात आणि त्या अधिक काळ टिकू शकतात.जमालुद्दीन म्हणाले की,फायबरच्या आकाराच्या मूर्तीची किंमत सुमारे २.८ लाख रुपये आहे. परंतु त्यात गुंतलेली सूक्ष्म कारागिरी किंमतीला न्याय देते.

हे ही वाचा:

आरोपीने सहकाऱ्याला पाठवला संसदेवरील हल्ल्याचा व्हिडीओ!

फेसबुकवर ओळख झाली, भगतसिंग नावाचा ग्रुप बनवला आणि संसदेवर हल्ला केला!

सुरक्षा भंग केल्याप्रकरणी लोकसभा सचिवालयाकडून आठ कर्मचाऱ्यांचे निलंबन

‘शिवराजसिंह चौहान, वसुंधरा राजेंवर नवी जबाबदारी सोपवणार’

हा प्रकल्प हाती घेण्याबाबत संकोच वाटतो का, असे विचारले असता जमालुद्दीन म्हणाले, ‘धर्म ही वैयक्तिक गोष्ट आहे. आपल्या देशात विविध धर्माचे लोक आहेत. आपण सर्वांनी एकत्र राहायचे आहे.मी प्रभू रामांचा पुतळा बनवल्यावर मला आंनद फार झाल्याचे त्यांनी सांगितले.बंधुभावाची ही संस्कृती एक कलाकार म्हणून माझा संदेश आहे, ते पुढे म्हणाले.

जमालुद्दीन पुढे म्हणाले की, ‘केवळ रामाच्याच नाही, तर मी दुर्गा आणि जगधात्रीच्याही मोठ्या मूर्ती बनवल्या आहेत, ज्यांना खूप प्रसिद्धीही मिळाली आहे.’ त्यांनी अभिमानाने सांगितले की ते वर्षानुवर्षे विविध हिंदू देवतांच्या फायबरच्या मूर्ती बनवत आहेत.त्यांच्या नावाने वर्कशॉप चालवणाऱ्या बिट्टूने सांगितले की,एक मूर्ती बनवण्यासाठी ३० ते ३५ कारागिरांची गरज असते आणि संपूर्ण मूर्ती तयार करण्यासाठी सुमारे एक ते दीड महिना इतका कालावधी लागतो.
या मूर्ती उत्तर प्रदेशात नेण्यासाठी ४५ दिवस लागू शकतात, असे या तरुण शिल्पकाराने सांगितले.

Exit mobile version