गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवर मुस्लिमांकडून थडगे, दर्गे, मशिदी बांधत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. ठाणे जिल्ह्यातील श्रीमलंग गड संदर्भात असे प्रकरण समोर आले आहे. एकेकाळी नवनाथांची समाधी म्हणून ओळखला जाणारा श्रीमलंग गड आता ‘हाजी अब्दुर रहेमान मलंग शाह बाबा’ म्हणून ओळखला जातो. स्थानिक पातळीवर यासाठी आता विरोध सुरू झाला असून यात आता आणखी श्रीमलंग गडाच्या जवळ असलेल्या पहारेश्वर पर्वताची भर पडली आहे.
या टेकडीवर अनेक समाधी बेकायदेशीरपणे बांधण्यात आल्या आहेत. पूर्वी या ठिकाणी प्राचीन शिवलिंग आणि नंदी असायचे. मात्र मुस्लिमांनी ते काढून येथे मकबरा बनवला आहे. या डोंगरावर मुस्लिमांचे अतिक्रमण होत असल्याचे हिंदूंना कळताच त्यांनी पैसा खर्च करून या डोंगराखालील शिवमंदिराचा जीर्णोद्धार करून तेथे शिवलिंग व नंदीची पुनर्स्थापना केली आहे. ज्याप्रमाणे मलंग गडाचे नाव मुस्लिमांनी ‘हाजी अब्दुररहमान मलंग शाहबाबा’ असे ठेवले आहे, त्याचप्रमाणे या पर्वताचे पूर्वीचे नाव ‘दादी माँ पर्वत’ आणि कार्तिक-गणेश पर्वताचे नाव ‘पीर पर्वत’ असे ठेवण्यात आले आहे.
डोंगरावर दोन हिरवे झेंडे असून केलेले सर्व बांधकाम हे पक्के बांधकाम आहे. डोंगरावरील सर्व थडग्या हिरव्या चादरीने झाकलेल्या आहेत. पहाडेश्वर टेकडीवर हिंदू संत रामबाबा यांची समाधी आहे. मात्र हिंदू संताची समाधी असूनही त्यावर हिरवी चादर चढवण्यात आली आहे. डोंगरावर जनरेटर देखील बसवण्यात आले आहेत. या जनरेटरचा वापर लाऊडस्पीकरसाठी आणि डोंगरावरील प्रकाश योजनेसाठी केला जातो.
हे ही वाचा:
पालिकेच्या विशेष सभेत कॉंग्रेसच्या नगरसेवकाचा धुआ, धुआ
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर मणिपूरमध्ये पहिली मालवाहू ट्रेन
सरकारने वाईन सर्वसामान्य दुकानात आणली…म्हणून त्यांनी परत केला पुरस्कार
पालकमंत्री अस्लम शेख यांच्या बॅनरबाजीने नगरसेवक वैतागले!
या डोंगरावर एक मंदिर असून ती जागा मुस्लिमांनी काबीज केली आहे. पूर्वी तिथे जाणाऱ्यांची संख्या फार कमी असायची, पण आता मुस्लिमांची संख्या वाढत आहे. ही जागा वनविभागाच्या मालकीची आहे, मात्र वनविभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. पोलिसही लक्ष देत नाहीत. सरकार बदलल्याने अतिक्रमण वाढले आहे, असे अंबरनाथ जिल्हा विश्व हिंदू परिषदेचे नेते राजेश गायकर यांनी सांगितले.
श्रीमलंग गडावरील अतिक्रमणाकडे सरकार अगोदरच दुर्लक्ष करत असून, ती वक्फ बोर्डाची मालमत्ता असल्याचे आता मुस्लिम दाखवू पाहत आहेत. स्थानिक हिंदुत्ववाद्यांनी त्याविरोधात आता कायदेशीर लढाई सुरू केली आहे. पहारेश्वर पर्वतावर मुस्लिमही आपला दावा सांगण्याचा प्रयत्न करतील, अशी भीती आता व्यक्त केली जात आहे. वनविभागाच्या निष्काळजीपणामुळे मुख्य टेकडीखाली दोन थडग्या बांधण्यात आल्या असून एकूण थडग्यांची संख्या ११ वर गेली आहे.