हिंदूच्या मंदिरासाठी मुस्लिम कुटूंबाने केली अडीच कोटी रुपयांची जमीन दान

हिंदूच्या मंदिरासाठी मुस्लिम कुटूंबाने केली अडीच कोटी रुपयांची जमीन दान

बिहारमधील एका मुस्लिम कुटुंबाने देशात जातीय सलोख्याचा आदर्श ठेवला आहे. राज्यातील पूर्व चंपारण जिल्ह्यातील कैथवालिया परिसरात बांधल्या जाणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या हिंदू मंदिरासाठी एका मुस्लिम कुटुंबाने त्यांची तब्बल अडीच कोटी रुपयांची जमीन दान केली आहे. पाटणा येथील महावीर मंदिर ट्रस्टचे प्रमुख आचार्य किशोर कुणाल यांनी पत्रकारांना ही माहिती दिली आहे. एकीकडे देशात दोन पंथांच्या लोकांमध्ये तणावाची प्रकरणे समोर येत असताना, ही बातमी जातीय सलोख्याचे उदाहरण आहे.

बिहारमध्ये बनवले जाणारे हे मंदिर जगातील सर्वात मोठे विराट रामायण मंदिर असणार आहे. या मंदिरासाठी इश्तियाक अहमद खान यांनी या मंदिराच्या भव्य बांधकामासाठी अडीच कोटी रुपयांची जमीन दान करण्याचा निर्णय घेतला आहे. इश्तियाक हे पूर्व चंपारणचे रहिवासी असून ते सध्या गुवाहाटीमध्ये व्यवसाय करतात.

चंपारणमध्ये विराट रामायण मंदिराच्या उभारणीची तयारी सुरू आहे. विराट रामायण मंदिर हे जगप्रसिद्ध आणि १२व्या शतकातील अंगकोर वाट मंदिरापेक्षा उंच असणार आहे. सुमारे पाचशे कोटी रुपये खर्चून हे मंदिर बांधण्यात येणार आहे. केशरिया, चंपारण येथे बांधण्यात येणारे रामायण मंदिर २७० फूट उंच, एक हजार ८० फूट लांब आणि ५४० फूट रुंद असणार आहे. हे मंदिर शंभर वर्षे टिकेल अशा पद्धतीने बांधले जाणार आहे. तब्बल शंभर एकरमध्ये हे मंदिर बांधले जात आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधान नरेंद्र मोदींही त्यांच्यापुढे झाले नतमस्तक

कंभोज यांच्या घराकडे आता पालिकेची वक्रदृष्टी

ओसीविरहित इमारतींना जादा दराने पाणीपुरवठा नको! अकृषक कायद्यालाही द्या स्थगिती

‘गली बॉय’ फेम रॅपर ​​धर्मेश परमारचे निधन

मंदिराच्या बांधकामासाठी नवी दिल्लीतील संसद भवनाच्या बांधकामात गुंतलेल्या अनेक नामवंत वास्तुविशारदांची मदत घेतली जाणार आहे. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी महासंचालक विनीत जयस्वाल यांना मंदिराच्या बांधकामासाठी मुख्य सल्लागार बनवण्यात आले आहे.

Exit mobile version