अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीत सहकार्य करण्यासाठी म्हणून एका मुस्लीम कुटुंबाने मोठे पाऊल उचलले आहे. मुझफ्फरनगर जिल्ह्यातील एका मुस्लीम कुटुंबाने राम मंदिराच्या उभारणीसाठी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ वैयक्तिक मालमत्ता सुपूर्द करण्याची घोषणा केली आहे. मुस्लीम समाजात चांगला संदेश जावा यासाठी म्हणून डॉ. मोहम्मद समर गझनी यांनी हा निर्णय घेतला आहे.
मुझफ्फरनगर येथील डॉ. मोहम्मद समर गझनी यांनी शुक्रवार, ६ मे रोजी जाहीर केलं की, त्यांना त्यांची सुमारे ९० लाख रुपयांची वैयक्तिक मालमत्ता राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे राम मंदिराच्या बांधकामासाठी सुपूर्द करायची आहे. जेणेकरून ही मालमत्ता विकून त्यातील पैसा राम मंदिराच्या उभारणीसाठी वापरता येईल. मुस्लिमांना अयोध्या आणि भगवा आवडतो, असा संदेश देशातील मुस्लीम समाजात जाईल, अशी आशा त्यांना आहे.
हे ही वाचा:
महिला IAS अधिकाऱ्याच्या घरी ईडीला सापडलं मोठं घबाड
श्रीलंकेत पुन्हा आणीबाणीचे संकट
‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये तीन मराठी सिनेमांची वर्णी
महाविकास आघाडीला पुन्हा फटका, पवई सायकल ट्रॅकला मनाई
२०२४ मध्ये मुख्यमंत्री योगी यांच्यासोबत मुस्लीम समाज मोठ्या संख्येने उभा राहावा. मुख्यमंत्री योगी हे कोणत्याही धर्माच्या विरोधात नाहीत, तर ते फक्त गुन्हेगार आणि माफियांच्या विरोधात असल्याचे गझनी म्हणाले. समर गझनी हे भगवे कपडे परिधान करून ईदची नमाज अदा केल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आले होते. गझनी हे भाजपा अल्पसंख्याक समाज मोर्चाचे माजी राज्यमंत्री राहिले आहेत.