देवीदेवतांची टिंगल उडवणारा मुनव्वर फारुकी गरब्यात मात्र नाचतो

देवीदेवतांची टिंगल उडवणारा मुनव्वर फारुकी गरब्यात मात्र नाचतो

स्टँडअप कॉमेडियन म्हणून नेहमीच भारतातील देवीदेवतांची टिंगल उडविणारा मुनव्वर फारुकी एका गरब्यात सहभागी झाल्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यावरून त्याच्यावर चहुबाजूंनी टीका होते आहे.

मुनव्वर फारुकी हा नियमितपणे आपल्या शोमधून देवीदेवतांवर शिंतोडे उडवताना दिसतो. त्याच्या त्या जुन्या शोचे व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहेत. त्यात गुजरात हा प्रदेश नवरात्री, उत्सव आणि दंगलींसाठी प्रसिद्ध असल्याचे तो म्हणतो. नवरात्रीबद्दलच्या माझ्या आठवणी आहेत. तो त्यात म्हणतो की, मी गरब्यात खेळायला जात असे. माझ्यासोबत असलेल्या मुलींना काही मुली सांगत की, यांच्यासोबत गरबा खेळू नका कारण हे चार लग्न करतात.

हे ही वाचा:

भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दल ‘या’ १० खास गोष्टी माहित आहेत का?

नवरात्री २०२२ : हिंगलाज माता पाकिस्तानातील एकमेव शक्तीपीठ

विमानतळावर ‘श्रीराम’ दिसले आणि…

इम्रान खान यांना अटक होणार?

 

फारुकीचे असे असंख्य व्हीडिओ देवीदेवतांवर अश्लाघ्य भाषेत टीका करणारे, उत्सवांची खिल्ली उडवणारे आहेत. अशा फारुकीला गरब्यात नाचण्याची परवानगी का देण्यात आली, असा सवाल लोक करू लागले आहेत. निळ्या रंगाच्या वेशात तो एका गरब्यात फेर धरताना दिसतो आहे. देवीदेवतांची टिंगल उडविणाऱ्या फारुकीला गरब्यात नाचण्याचा काय अधिकार असा सवाल अनेक नामांकित लोकांनीही विचारला आहे.

सध्या गरब्यात मुस्लिमांना प्रवेश देऊ नये अशी एक मागणी पुढे आली आहे. त्यावरूनही बरेच राजकारण तापले आहे. जो देवीचा उत्सव आहे, त्याबद्दल ज्यांना आदर आहे, जे देवीला मानतात त्यांनीच गरब्यामध्येही सामील व्हावे अशी ही मागणी आहे. त्यासाठी गरब्यात सहभागी होणाऱ्यांचे आधार कार्ड तपासून मगच त्यांना प्रवेश देण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. त्यावरूनही टीका होत आहे. पण फारुकीच्या गरब्यातील सहभागामुळे आधार कार्ड तपासण्याच्या मागणीला पाठिंबा मिळू लागला आहे.

Exit mobile version