मुंबई उपनगर: भांडुपमध्ये हिंदुंवरील सततच्या आक्रमणाच्या विरोधात सकल हिंदू समाजाने पुकारला बंद!

हिंसाचारात मृत पीडित हिंदूंना श्रद्धांजली वाहण्यासाठी, हिंदू कार्यकर्त्यांवरील सततच्या हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी, तसेच लव जिहाद-लँड जिहाद सारख्या राष्ट्रविघातक कारवाया आणि बांग्लादेशी रोहिंग्यांची अनधिकृतपणे घुसखोरी या विरोधात हिंदू समाजाने एक दिवसीय बंद पुकारला आहे.

मुंबई उपनगर: भांडुपमध्ये हिंदुंवरील सततच्या आक्रमणाच्या विरोधात सकल हिंदू समाजाने पुकारला बंद!

Mumbai suburbs: In Bhandup, the entire Hindu community called a bandh against the continuous attack on Hindus!

शनिवार दि.१ ७  ऑगस्ट, देशभरात लव जिहादच्या करस्थानांत आणि बांग्लादेशात टार्गेट किलिंग मध्ये बळी पडलेल्या हिंदूंना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबई उपनगरातील भांडुप येथे सकल हिंदू समाजाने मोठ्या प्रमाणात मोर्चाची हाक दिली. हिंदू आक्रोश प्रकट करणाऱ्या मोर्चासोबतच आज भांडुप मधील व्यापाऱ्यांनी बंद पुकारुन पीडित हिंदूंसाठी संवेदना व्यक्त केली आहे. या आक्रोश मोर्चा सोबतच शनिवारी संध्याकाळी ७ वा हिंदू समाज, सर्व राजकीय पक्ष, संघटनांनी एकत्र येऊन ‘हिंदू वेदना- श्रद्धांजली सभा’ देखील घेण्याची घोषणा केली आहे.

हे ही वाचा:

कोल्हापुरातील रुईमध्ये पूर्व वैमनस्यातून दोन गटात हाणामारी, एकाचा मृत्यू !

गंगा नदी मार्गावरील पुलाचा एक भाग तिसऱ्यांदा कोसळला

बांग्लादेशातील हिंसाचारात मृत पीडित हिंदूंना श्रद्धांजली वाहण्यासाठी, हिंदू कार्यकर्त्यांवरील सततच्या हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी, तसेच लव जिहाद-लँड जिहाद सारख्या राष्ट्रविघातक कारवाया आणि बांग्लादेशी रोहिंग्यांची अनधिकृतपणे घुसखोरी या विरोधात हिंदू समाजाने एक दिवसीय बंद पुकारला आहे. यावेळी भांडुप पश्चिमेत गाढव नाक्यावरील अशोक केदारे चौक येथे सायंकाळी ७ वा. ‘हिंदू वेदना- श्रद्धांजली सभा’ घेण्यात येणार आहे. हिंदूंच्या रक्षणकर्ता सरकारला इशारा देण्यासाठी आक्रोश मोर्चा देखील काढण्यात येणार आहे.

सकल हिंदू समाजाने भांडुप मधील अनधिकृत बांधकाम, रस्त्यावरील अतिक्रमणाच्या माध्यमातून लँड जिहाद, सोबतच फेरीवाल्यांच्या माध्यमातून लँडजिहाद- लवजिहाद याबद्दल हिंदू समाजाला सतर्क करण्यासाठी सभा घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. यासोबतच भांडुप मध्ये घुसखोरी केलेल्या रोहिंग्या – बांग्लादेशींचा तातडीने शोध घेऊन भांडूप ‘घूसखोरी मुक्त’ करण्याची मागणी सकल हिंदू समाज मोर्चाच्या माध्यमातून करणार आहे.

हे ही वाचा:

साबरमती एक्स्प्रेसचे २२ डबे रुळावरून घसरले, रेल्वे वाहतूक ठप्प !

स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाला केंद्राची मंजुरी

राजस्थान: उदयपूरमध्ये हिंसाचारानंतर नागरी सुरक्षा संहितेचे कलम 163 लागू; शाळा, इंटरनेट सर्व बंद!

 

Exit mobile version