मुलुंड येथील भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आणि मुलुंड सेवा संघाचे अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनी मुलुंड येथे दिवाळी पाहायचे आयोजन करण्यात आले आहे. मुलुंड पश्चिम येथील महाकवि कालिदास नाट्यगृहामध्ये ४ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ६.३० वाजता हा ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मुलुंड सेवा संघाचे अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनी दिली आहे.
मुलुंड सेवा संघाच्या या कार्यक्रमात प्रसिद्ध ज्योतिष तज्ञ, राशीचक्रकार शरद उपाध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध हास्य कवी अशोक नायगावकर हे सहभागी होणार आहेत. तर दत्ता मेस्त्री, माधुरी करमरकर आणि निमिष कैकाडी यांच्या सुरेल गायन मैफिलीचा आनंद रसिक श्रोत्यांना लुटता येणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन प्रसिद्ध निवेदिका स्मिता गवाणकर करणार आहेत. तर कार्यक्रमाची संकल्पना आणि संयोजन दिगंबर प्रभू यांचे आहे.
हे ही वाचा:
नवाब मलिकांना भोगावे लागणार गंभीर परिणाम
माजी खासदार पुंडलिक दानवे यांचे निधन
गेले अनेक महिने कोविड महामारीमुळे बंद असलेली नाट्यगृहे आता नव्याने सुरू झाली आहेत. मुलुंड मधील प्रसिद्ध अशा कालीदास नाट्य संकुलात कोविड नंतर होणारा हा पहिलाच कार्यक्रम असणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला एक वेगळे महत्त्व आहे. त्यामुळे मुलुंडकर रसिक श्रोते या कार्यक्रमासाठी उत्सुक झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.