भारत आदर्श समाज म्हणून उदयास यावा यासाठी आरएसएसचे काम

भारत आदर्श समाज म्हणून उदयास यावा यासाठी आरएसएसचे काम
संपूर्ण जगासाठी भारत एक आदर्श समाज म्हणून उदयास यावा यासाठी आरएसएस समाजाला जागृत आणि एकत्र करण्याचे काम करत आहे. लोकांनी व्यक्ती म्हणून नव्हे तर समाजाच्या सेवेसाठी पुढे आले पाहिजे असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर संघचालक मोहन भागवत म्हणाले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्ली विभागातील कार्यकर्त्यांकडून राबविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी उपक्रमांवर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
भारत संपूर्ण जगासाठी एक आदर्श समाज म्हणून उदयास यावा यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजाला जागृत करण्याचे, संघटित करण्याचे काम करत आहे. समाजाच्या विविध घटकांतील अनेक व्यक्तींनी बलिदान दिले आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिले, परंतु एक समाज म्हणून आपला विकास व्हायला वेळ लागला असही मोहन भागवत यावेळी म्हणाले.
भारतीय व्यक्ती म्हणून नाही तर समाज म्हणून विचार करतात आणि तोच त्यांचा मूळ स्वभाव आणि डीएनए असून त्याला अधिकाधिक प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे सांगून भागवत यांनी संघ कार्यकर्त्यांना वैयक्तिक हितसंबंधांची पर्वा न करता समाजासाठी काम करण्याचे आवाहन केलं. कल्याणकारी काम करताना मी आणि माझे यापेक्षा समाजाला प्राधान्य देण्याची गरज आहे. हे आपल्याला एक समाज म्हणून विकसित होण्यास मदत करेल याकडेही त्यांनी लक्ष वेधलं
हे ही वाचा:

इकबाल कासकरच्या बॉडीगार्डला मारणाऱ्या फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या

“उद्धव ठाकरेंनी शिवाजी महाराजांसारखा तह करायला हवा होता”

सिसोदियांसह १३ जणांविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी

बांदीपोरामधून एका दहशतवाद्याच्या आवळल्या मुसक्या

समाज जेव्हा एखाद्या वातावरणात एक मनाने आणि  निश्चय करून उभा राहतो तेव्हा त्याला समाज म्हणतात. समाज म्हणजे सहकार्याने एकत्र आलेले लोक नाही तर एक समान उद्दिष्ट ज्यांच्या समोर असते तो समाज, असेही भागवत म्हणाले.
Exit mobile version