पंतप्रधान नरेंद्र मोदींचा २२ जानेवारीला व्यस्त कार्यक्रम

राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कडक अनुष्ठान

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा २२ जानेवारीला व्यस्त कार्यक्रम

राम मंदिरातील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कडक उपासनेला सुरुवात केली आहे. ते तोपर्यंत जमिनीवर झोपणार असून केवळ नारळ पाण्याचे सेवन करणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी जेव्हा सन १९९०मध्ये सोमनाथमधून राम जन्मभूमी चळवळीला सुरुवात केली होती, तेव्हा स्वतः नरेंद्र मोदी यांचा या रथयात्रेत सक्रिय सहभाग होता. पंतप्रधान मोदी हे सन २०२०मध्ये अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनालाही उपस्थित होते. आता रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी ११ दिवसांच्या अनुष्ठानाला सुरुवात केली आहे.

२२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा असा असेल अयोध्या दौरा

सकाळी १०.२५ वाजता – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अयोध्येतील विमानतळावर आगमन

सकाळी १०.४५ वाजता – अयोध्येतील हेलिपॅडवर आगमन

सकाळी १०.५५ वाजता – राम जन्मभूमीस्थळी आगमन

सकाळी ११ ते दुपारी १२ – राखीव

दुपारी १२.०५ ते १२.५५- प्राणप्रतिष्ठेच्या विधीला सुरुवात

दुपारी १२.५५ वाजता – पंतप्रधान नरेंद्र मोदी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातून निघतील.

दुपारी १ वाजता – सार्वजनिक सोहळ्याच्या ठिकाणी आगमन

दुपारी १ ते दुपारी २ – पंतप्रधान मोदी अयोध्येतील सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावतील.

दुपारी २.१० वाजता – कुबेर टेकडीला भेट

हे ही वाचा:

राम सिया राम.. अयोध्येला जाणाऱ्या विमानातील लोक राम भजनात नाचून दंग!

पंतप्रधानांकडून मुनई मंदिरात केली प्रार्थना!

लंडनच्या गल्ल्यांमध्ये ‘जय श्रीरामा’चा गजर!

११० किलो फळफुलांचा अभिषेक, ८१ कलश पाण्याने शुद्ध केले राममंदिर!

पंतप्रधान नरेंद्र मोदी रामायणाशी संबंधित मंदिरांना भेटी देत आहेत. शनिवारी त्यांनी तमिळनाडू येथील श्री रंगनाथास्वामी आणि रामनाथास्वामी मंदिरांना भेट देऊन रामेश्वरम येथील ‘अंगी तीर्थ’ किनाऱ्यात पवित्र स्नान केले. पंतप्रधान मोदी यांनी रामायणाशी संबंधित प्राचीन तीर्थक्षेत्र असलेल्या श्री रंगम येथे ‘कंब’ रामायणाचे पंडितांनी केलेल्या वाचनाचे श्रवण केले. तत्पूर्वी त्यांनी आंध्र प्रदेश आणि केरळमधील मंदिरांमध्ये प्रार्थना केली.

कडेकोट बंदोबस्त

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराच्या ठिकाणी आणि लता मंगेशकर चौक येथे बॅरिकेड्स लावण्यात आले असून केवळ सोहळ्याची तयारी करणाऱ्या गाड्यांनाच परवानगी देण्यात आली आहे.

Exit mobile version