पंतप्रधान मोदींनी केले अनावरण
आदिगुरू शंकराचार्य यांच्या १२ फुटी शिल्पाचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. केदारनाथ मंदिराच्या मागील बाजूस हे शिल्प आहे.
पंतप्रधान देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तराखंडमध्ये आहेत. तिथे त्यांनी केदारनाथाचे दर्शन घेतले. त्यानंतर आदिगुरू शंकराचार्यांच्या शिल्पाचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते झाले.
उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग येथे हे १२ फुटी शिल्प आहे. आठव्या शतकातील आदिगुरुंच्या समाधीस्थळाचेही पंतप्रधानांनी उद्घाटन केले. २०१३च्या महापुरात या समाधीस्थळाचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे हे स्थळ पुन्हा उभे केले गेले. त्याचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले. त्यानंतर पंतप्रधान मोदी शंकराचार्याच्या शिल्पाजवळ काही काळ ध्यानस्थही झाले.
आदिगुरू शंकराचार्यांचे हे शिल्प म्हैसूरस्थित शिल्पकारांनी साकारले आङे. पाऊस, ऊन, अत्यंत वाईट हवामानाचा या शिल्पावर कोणताही परिणाम होणार नाही अशा क्लोराइट शिस्ट दगडातून हे शिल्प साकारले आहे. योगीराज शिल्पी यांनी हे शिल्प साकारले असून त्यासाठी १२० टन दगड वापरण्यात आले आहेत. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात शिल्पनिर्मितीला प्रारंभ झाला होता.
या शिल्पाची चमक वाढविण्यासाठी नारळाच्या पाण्याचा वापर करण्यात येतो. आदिगुरू शंकराचार्य हे ध्यानस्थ बसलेल्या स्थितीत आहेत. तब्बल ३५ टनांचे हे शिल्प आहे. म्हैसूर येथे हे शिल्प तयार करण्यात आले आणि तिथून हेलिकॉप्टरने ते केदारनाथला आणण्यात आले. या शिल्पनिर्मितीसाठी आदिगुरू शंकराचार्याच्या वेगवेगळ्या १८ चित्रांमधून एक चित्र पंतप्रधान मोदी यांनी निवडले.
हे ही वाचा:
चार धाम देवस्थान बोर्ड होणार बरखास्त?
‘सुशासन पर्व’ वाचनीय दिवाळी अंक!
दिवाळीनिमित्त मुस्लिम महिलांनी केली राम आरती
आदिगुरू शंकराचार्य हे आठव्या शतकातील महान योगी होते. देशभरात चार मठांची स्थापना करून त्यांनी हिंदुत्व बळकट करण्यासाठी स्वतःचे जीवन अर्पण केले. उत्तराखंड येथे केदारनाथजवळ त्यांनी समाधी घेतली.