छत्रपती शिवरायांच्या वाघनखांसाठी लंडनला जातोय हा अभिमानाचा क्षण !

कार्यकर्त्यांचा जल्लोष अन् ढोल ताशांच्या निनादात मंत्री सुधीर मुनगंटीवार लंडनकडे रवाना

छत्रपती शिवरायांच्या वाघनखांसाठी लंडनला जातोय हा अभिमानाचा क्षण !

छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा कोथळा वाघनखांनी बाहेर काढला हे आपण लहानपणापासून शिकलो आहोत; ऐकत आलो आहोत. ती वाघनखे ३५० व्या राज्याभिषेक वर्षात शिवप्रेमींच्या दर्शनाला भारतात आणण्याच्या दृष्टीने करार करण्यास लंडन येथे जाताना खूप अभिमान वाटतो आहे, असे भावोद्गार राज्याचे सांस्कृतिक कार्य, वन आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले. लंडन येथे रवाना होण्यापूर्वी मुंबई विमानतळ मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर मुनगंटीवार कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. आमदार पराग अळवणी, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चव्हाण, अमोल जाधव, विनीत गोरे, स्थानिक नगरसेविका यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

मुनगंटीवार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर पोहोचताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या, ढोल ताशांचा गजर आणि लेझिम पथकाने परिसर दणाणून सोडला. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहीती देत हे सरकार छत्रपती शिवाजी महाराज यांना अपेक्षित रयतेचे राज्य महाराष्ट्राला देण्याचा संकल्प करुन काम करीत असल्याचे स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे, आमची प्रेरणा आहे त्यांच्या विचारसरणीला धरून केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार काम करीत आहे हे स्पष्ट केले.

 

छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि आता त्यांनी वापरलेल्या वाघनखांबाबत शंका उपस्थित करणे दुर्दैवी असून; जेव्हा ब्रिटेनशी प्रत्यक्ष करार करण्याची वेळ आली त्याच वेळी केवळ जनतेच्या मनांत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धकालीन शस्त्र असलेली ही वाघनखे ब्रिटनच्या विक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम मधून भारतात परत आणण्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार रवाना झाले आहेत.

हे ही वाचा:

जमिनीच्या वादातून एकमेकांवर गोळीबार, ६ ठार!

गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरे काय म्हणाले?

एलॉन मस्क यांनी ट्रुडो यांच्याविरोधात थोपटले दंड!

पुण्यातील इसिस मॉड्यूल प्रकरणातील दहशतवाद्यास अटक

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष प्रारंभ होताच ही वाघनखे भारतात परत आणण्याचा संकल्प सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता. यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात केंद्र शासन तसेच आंतराष्ट्रीय पातळीवर सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. १५ एप्रिल २०२३ रोजी मुंबई येथे ब्रिटेनचे पश्चिम भारत उप उच्चायुक्त अँलेन गँमेल यांच्यासह ब्रिटन च्या राजकीय व द्विपक्षीय संबंध उपप्रमुख श्रीमती इमोगेन स्टोन यांच्यासोबत बैठक घेवून महाराष्ट्र शासनाने व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाशी पत्रव्यवहार सुरू केला होता.

मंगळवारी ३ ऑक्टोबर रोजी व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम येथे भेट देऊन या संग्रहलायचे संचालक श्री ट्रायस्टम हंट यांच्यासोबत त्यांची बैठक होईल व करारावर स्वक्षऱ्या होतील.

Exit mobile version