अल्लाह तआला देख लेगा… ‘न्यूज डंका’च्या बातमीसह ‘हा’ मेसेज व्हायरल

कट्टरवाद्यांची वादात उडी

अल्लाह तआला देख लेगा… ‘न्यूज डंका’च्या बातमीसह ‘हा’ मेसेज व्हायरल

मंदिरांमध्ये भाविकांकडून त्यांच्या श्रद्धास्थानाला जो प्रसाद अर्पण केला जातो त्या प्रसादात अनेकदा वर्ज्य आणि अपवित्र पदार्थ मिसळले जात असल्याचे प्रकार वारंवार समोर आले आहेत. यामुळे हिंदू धर्मियांच्या आस्थेला ठेच लागत असून प्रसादाचे पावित्र्यही अशुद्ध होत आहे यामुळेचं भाविकांची आस्था आणि हिंदू धर्माचे पावित्र्य जपण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना एकटवल्या आहेत. यासाठी ‘ओम प्रतिष्ठान’ची स्थापना करण्यात आली असून प्रसादाचे पावित्र्य राखण्यासाठी ‘ॐ प्रमाणपत्र’ देण्यात येणार आहे. या चळवळीला हिंदुत्ववादी संघटनांनी समर्थन देत ‘ॐ प्रमाणपत्रा’ला शुभाशीर्वाद दिले आहेत. मात्र, दुसरीकडे या चळवळी विरोधात अन्य धर्मियांच्या पोटात पोटशूळ उठाण्यास सुरुवात झाली आहे.

प्रसाद शुद्धीची चळवळ, ओम प्रतिष्ठान, ॐ प्रमाणपत्र याबद्दलची सविस्तर बातमी ‘न्यूज डंका’ने दिली होती. मात्र, यानंतर ‘न्यूज डंका’च्या प्रसाद शुद्धीकरणाच्या बातमीच्या लिंकसोबत ‘अल्लाह तआला देख लेगा’ या ओळीसह काही मेसेजेस मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे लक्षात आले आहे. हिंदू भाविक मंदिरात अर्पण करत असलेला प्रसाद हा शुद्ध आणि पवित्र असावा; यासाठी हिंदूंनी आपल्या श्रद्धास्थानाला आणि आराध्याला प्रसाद अर्पण करण्यासाठी कोणाकडून प्रसाद विकत घ्यावा हा सर्वस्वी हिंदू भाविकांचा निर्णय आहे. त्यामुळे या घडामोडींनंतर कट्टरवाद्यांनी या वादात उडी घेतली आहे.

मंदिराबाहेर मिळणाऱ्या प्रासादामध्ये अनेकदा विधर्मी व्यक्तिंद्वारा भेसळ केल्याचे प्रकार समोर आलेले आहेत. प्रसादात बनावट पदार्थ, जनावरांच्या चरबीची भेसळ असलेले तूप वापरल्याच्या घटना घडत असल्याचे वृत्त समोर येत असते. अशा घटनांना आळा घालण्यासाठीचं ही चळवळ उभी राहिली आहे.

काय आहे व्हायरल मेसेज?

सावधान.सावधान.सावधान.

त्र्यंबकेश्वर येथील सर्व प्रसाद विक्रेत्यांनी सावध राहावे, काही हिंदू संघटना त्र्यंबकेश्वर येथे येऊन प्रसाद विक्रेत्यांना “ओम सर्टिफिकेट” देणार.

प्रसाद विक्रेतांना सर्टिफिकेट देणारे तुम्ही कोण? तुम्हाला सर्टिफिकेट देण्याचा अधिकार कोणी दिला? सरकारची अन्न व औषध यंत्रणा असताना तुमची गरज काय? तुम्हाला सरकारी यंत्रणांवर विश्वास नाही का? अल्लाताला माफ नही करेगा

तरी अशा संघटना त्र्यंबकेश्वर येथील प्रसाद विक्रेत्यांकडे आले तर कृपया सावध राहावे हीच विनंती. त्या संघटनांची विचार पुस करुन हे करण्यासाठी तुम्हाला कोणत्या सरकारी खात्या मार्फत परवानगी दिली का? आपल्याला अधिकार नसताना का? करत आहे. असे पुरावे त्या संघटनाकडे न मिळाल्यास कृपया त्वरित जवळच्या स्थानिक पोलीस स्टेशन ठिकाणी तक्रार करावी ही विनंती

तसेच त्र्यंबकेश्वर येथील वातावरण दूषित करण्याचे काही संघटना करत आहे तरी सर्वांनी सावध राहावे. जनहित मे जारी

प्रसाद विक्रेता स्थानिक नागरिक

हे ही वाचा:

परममित्र प्रकाशनाचे माधव जोशी यांचे निधन

मुबिना युसूफकडून हिंदू मुलीवर धर्मांतर करून तिच्या मुस्लिम मित्राशी लग्न करण्यासाठी दबाव!

३०० कोटींच्या मालमत्तेसाठी सासऱ्याची हत्या; मारेकऱ्यांना एक कोटीची सुपारी!

हत्या करण्यासाठी फॅन क्लबच्या सदस्याचा वापर!

मंदिरांमध्ये भाविकांकडून त्यांच्या श्रद्धास्थानाला जो प्रसाद अर्पण केला जातो त्या प्रसादात अनेकदा वर्ज्य असलेले पदार्थ मिसळले जात असल्याचे प्रकार वारंवार समोर आले आहेत. यामुळे हिंदू धर्मियांच्या आस्थेला ठेच लागत असून प्रसादाचे पावित्र्यही अशुद्ध होत आहे. धार्मिक आस्थांशी निगडीत असलेला प्रश्न सोडविण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना एकटवल्या आहेत. प्रसाद शुद्धीच्या चळवळीची सुरुवात नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथून होणार आहे.

मंदिरांमध्ये अर्पण करण्यात येणाऱ्या प्रसादाचे पावित्र्य, सात्विकता आणि शुद्धता अबाधित रहावी यासाठी हिंदुत्व संघटनांनी पुढाकार घेतला आहे. प्रसाद विकणाऱ्या दुकानांना ‘ओम सर्टिफिकेट’ दिले जाणार आहे. हिंदूंच्या आराध्याला अर्पण करण्यात येणारा प्रसाद हा सात्विक आहे की नाही याची तपासणी केली जाणार आहे. प्रसादात वापरल्या जाणाऱ्या पदार्थामध्ये अशुद्ध घटक वापरले जात नाहीत ना याची खात्री केली जाणार आहे. सर्व योग्य पद्धतीने सुरू असल्यास संबंधितांना ‘ओम सर्टिफिकेट’ दिले जाणार आहे.

Exit mobile version