भारत हा विविध संस्कृतींचा देश आहे. जर तुम्ही भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये फिरलात तर तुम्हाला आढळेल की त्या सर्व अनोख्या आणि आश्चर्यकारक गोष्टींनी भरलेल्या आहेत. इथे प्रत्येक ठिकाणाची स्वतःची खासियत आहे. आज आम्ही तुम्हाला भारतातील अशाच एका गावाबद्दल सांगणार आहोत, जे भारतातील सर्वात अनोख्या ठिकाणांपैकी एक आहे. संपूर्ण जगापेक्षा हे गाव इतकं वेगळं आहे की अनेकांना त्याची माहितीही नाही. हे मेघालयातील कोंगथोंग गाव आहे. कोणाला हाक मारायचे तर आपण नावाने हाक मारतो.नाही तर टोपण नावाने.पण हे गाव असेआहे जिथे या पैकी काहीच करत नाहीत. या गावात प्रत्येकजण एकमेकांना चक्क शिळ घालून हाक मारतात. गंमत म्हणजे प्रत्येकाची शिळ वेगवेगळी. पण ऐकणाऱ्याला ती बरोब्बर कळते.त्यामुळेच हे गाव ‘व्हिसलिंग व्हिलेज’ म्हणजेच शिट्ट्टीचे गाव म्हणूनच ओळखले जाते.
हे गाव आहे भारतातलेच. हे छोटे आणि अनोखे गाव आहे. हे गाव टेकड्यांमध्ये वसलेलं आहे आणि व्हिसलिंग व्हिलेज म्हणून प्रसिद्ध आहे. मेघालयची राजधानी शिलाँगपासून ६० किमी अंतरावर पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातले कोंगथोंग गाव. या गावात कुठेही जा लोक एकमेकांना त्यांच्या नावाने नाही तर विशिष्ट धून वाजवताना दिसतील. इतकेच नाही तर येथे राहणाऱ्या प्रत्येक गावकऱ्यांना दोन नावे आहेत, एक सामान्य नाव आणि दुसरे धून असलेले नाव.
विशेष म्हणजे या गावातील लोक लाजाळू असून, बाहेरच्या लोकांशी फार लवकर मिसळत नाहीत. या गावात रस्त्याने चालत असताना तुम्हाला अनेक शिट्ट्यांचे आवाज ऐकू येतील.काँगथोंगचे गावची ७०० लोकसंख्या आहे.म्हणजेच जवळपास ७०० धून गावात रोज वाजवली जाते. येथील गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही शिळ घालण्याची पद्धत कधी सुरू झाली ते माहीत नाही.पण पिढ्यानपिढ्या सुरू आहे. एक लहान धून आणि दुसरी दीर्घ धून प्रत्येकाकडे असते.
हे ही वाचा :
ब्रिस्बेनच्या लक्ष्मी नारायण मंदिरात मोदींविरोधी घोषणा
स्टम्प घेऊन आलेल्या हल्लेखोरांचे कोच कोण हे पण आम्हाला माहिती
संदीप देशपांडे हल्ला प्रकरणात मोठी अपडेट, संशयाची सुई ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर
हिमंता बिस्वसर्मांनी राहुल गांधींवर केला ट्विट हल्ला!
जकार्तामध्ये तेल गोदामाला लागलेल्या आगीत १७ जणांचा होरपळून मृत्यू
धून म्हणजे’आईचे प्रेमगीत’
गावातील एखादी स्त्री गरोदर असते तेव्हा ती तिच्या बाळासाठी अंगाईगीतांचा विचार करते. माता आपल्या बाळाला लहानपणीच ही धून देते . मुलाच्या जन्मानंतर ही धून बाळाला परिचित व्हावी म्हणून त्याच्या सभोवतालचे प्रौढ लोक सतत ती धून ऐकवत राहतातकोंगथोंगचे गावकरी या धूनला झिंगरवाई लवबी म्हणतात, ज्याचा अर्थ ‘आईचे प्रेमगीत’ आहे. बाळाच्या जन्मानंतर आई त्याला सूर देते एखाद्या व्यक्तीला संबोधण्यासाठी वापरली जाणारी ‘धुन’ बाळंतपणानंतर माता बनवतात. एखाद्या गावकऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्यासोबत त्या व्यक्तीचा सूरही मरतो.
सर्वोत्कृष्ट पर्यटन गावासाठी नामांकन
पर्यटन मंत्रालयाने २०२१ मध्ये जागतिक पर्यटन संघटनेच्या सर्वोत्कृष्ट पर्यटन गावांच्या पुरस्कारासाठी कोंगथोंग गावाचे नामांकन देखील केले.आता मेघालयातील इतर काही गावांतील लोकही ही प्रथा स्वीकारत आहेत. ही व्यवस्था पारंपारिकपणे पिढ्यानपिढ्या पार केली जाते. आम्ही या प्रथा सुरू ठेवत आहोत