स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अमुल्य योगदान देणाऱ्या महिला क्रांतिकारकांवर एक विशेष पुस्तक काढण्यात आले आहे. केंद्रीय सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्या हस्ते या पुस्तकाचे लोकार्पण करण्यात आले आहे. ‘भारतातील अज्ञात महिला स्वातंत्र्यसेनानी’ या विषयावरील हे चित्रमय स्वरूपाचे पुस्तक असून भारतातील प्रसिद्ध प्रकाशन संस्था, अमर चित्र कथा यांच्या सहकार्याने हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.
स्वातंत्र्य आंदोलनात, ज्यांनी स्वातंत्र्याची ज्योत लोकांच्या मनात जागृत केली आणि आंदोलनाचे नेतृत्व केले, देशभर हा आंदोलनात अग्नि प्रज्वलित ठेवला अशा काही अज्ञात महिला स्वातंत्र्यसेनानीच्या जीवनकार्याचा गौरव या चित्रमय पुस्तकात करण्यात आला आहे, असे मीनाक्षी लेखी यावेळी म्हणाल्या. ज्यांनी वसाहतवादी साम्राज्याविरुद्ध लढा दिला अशा राण्यांची कथा यात आहे. तसेच ज्यांनी भारतमातेसाठी आपले आयुष्य वेचले, जीवाचे बलिदान दिले, अशा महिलांची कथाही यात आहे, असे त्या पुढे म्हणाल्या.
हे ही वाचा:
ठाकरे सरकारला ‘सर्वोच्च’ दणका…भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द
महाभकास आघाडी सरकारच्या हुकूमशाही प्रवृत्तीचे थोबाड फोडणारा निर्णय
मैदानाला अनधिकृतरीत्या टिपूचे नाव देणाऱ्या सेनेला महात्मा गांधींच्या नावाचा विसर
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे ठाकरे सरकारला थप्पड
जर आपण भारताच्या गौरवशाली इतिहासाकडे नजर टाकली, तर आपल्या दिसेल की भारताच्या संस्कृतीत सुरुवातीपासूनच महिलांचा सन्मान केला जात असे, तिथे स्त्री-पुरुष भेदभावाला थारा नव्हता. अनेक पुराव्यांवरुनही ही सिद्ध झाले आहे की महिलांमध्ये प्रत्यक्ष रणभूमीवर लढण्याचे धैर्यही होते आणि शौर्यही ! असेही त्यांनी सांगितले. या पुस्तकातील काही वीर महिलांच्या कथा उद्धृत करत मीनाक्षी लेखी म्हणाल्या की साम्राज्यवादी ब्रिटिश शासनाविरोधात महिलांनीही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून विरोध प्रदर्शन केले होते. उदाहरण म्हणून त्यांनी राणी अब्बाक्का यांचे उदाहरण दिले, ज्यांनी कित्येक दशके पोर्तुगीज हल्ल्यांचा सामना केला. मात्र त्यांच्या दृष्टिकोनातून फारसा इतिहास कधी लिहिलाच गेला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आता मात्र, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त अशा अज्ञात नायक-नायिकांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, त्याग प्रकाशात आणले जात आहे, असे लेखी यांनी सांगितले.