‘सनातन धर्म : सर्व विज्ञानांचा खरा स्रोत’ च्या मराठी आवृत्तीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते प्रकाशन

विवान कारुळकरला मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

‘सनातन धर्म : सर्व विज्ञानांचा खरा स्रोत’ च्या मराठी आवृत्तीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते प्रकाशन

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘सनातन धर्म : सर्व विज्ञानांचा खरा स्रोत’ या मराठी आवृत्तीचे प्रकाशन शुक्रवारी मेघदूत बंगल्यावर करण्यात आले. विवान कारुळकरने लिहिलेल्या या पुस्तकाच्या इंग्रजी आणि हिंदीतील आवृत्त्या यापूर्वीच प्रकाशित झालेल्या आहेत. मराठी भाषेतील आवृत्तीचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याशिवाय, द सनातन धर्म : ट्रू सोर्सेस ऑफ ऑल टेक्नॉलॉजीस हे पुस्तकही मुख्यमंत्र्यांना प्रदान करण्यात आले.

प्रसिद्ध उद्योगपती आणि कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत कारुळकर तसेच त्यांच्या पत्नी व प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष शीतल कारुळकर हेदेखील यावेळी उपस्थित होते. त्याशिवाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अजय धाक्रस आणि शिवव्रत महापात्रा यांचीही उपस्थिती लाभली.

हे ही वाचा:

बांगलादेश भारताकडून तांदूळ आयात करणार

६ वर्षांपासून बेकादेशीररित्या दिल्लीत राहणाऱ्या बांगलादेशी महिलेला अटक !

मनमोहन सिंग एक दयाळू व्यक्ती, अभ्यासू अर्थतज्ञ आणि सुधारणांना समर्पित नेते म्हणून स्मरणात राहतील

अलिगढ विद्यापीठात ३ बांगलादेशी विद्यार्थ्यांना बंदी, कधीही प्रवेश मिळणार नाही!

मुख्यमंत्र्यांनी विवानच्या या प्रयत्नांचे भरपूर कौतुक केले तसेच त्याला शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांनी विवानसह संवाद साधत त्याच्याकडून या पुस्तकाबद्दल जाणून घेतले. महाराष्ट्रातील एका मुलाने ही कामगिरी केली याबद्दल मुख्यमंत्र्यांनी विवानला शाबासकी दिली, तसेच यापुढेही त्याला अशा कोणत्याही संकल्पनेसाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याची तयारीही दर्शविली.

विवानने वयाच्या १६व्या वर्षी हे पुस्तक लिहिले असून लहान वयात त्याने केलेल्या या संशोधनाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या पुस्तकाच्या तीन वेगवेगळ्या भाषांतील आवृत्त्या निघाल्या आहेत. आता तंत्रज्ञानावरही त्याचे इंग्रजीतील पुस्तक उपलब्ध असून त्याची प्रतही मुख्यमंत्र्यांना प्रदान करण्यात आली.

विवानच्या पुस्तकाचे देशभरात तसेच विदेशातही खूप कौतुक झाले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विवानच्या या पुस्तकाचे कौतुक केले असून त्याला प्रोत्साहन दिले आहे.

वेदांमध्ये जे लिहिले आहे ते आजचे विज्ञान आहे, असा मतितार्थ या पुस्तकातून विवानने मांडला आहे. विज्ञान आणि सनातन धर्म यांचा संबंध नाही असा दुष्प्रचार करणाऱ्यांना विवानने आपल्या या पुस्तकाच्या माध्यमातून उत्तर दिले आहे तसेच नवी पिढी विज्ञानाबरोबरच भारतीय संस्कृती, परंपरा याकडेही सकारात्मक पद्धतीने पाहते हेदेखील त्याने आपल्या या लेखनाच्या माध्यमातून दाखवून दिले आहे.

हरियाणामधील गुरूग्राम येथील एसजीटी विद्यापीठात मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये द सनातन धर्म : ट्रू सोर्सेस ऑफ ऑल टेक्नॉलॉजीस या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष एस. सोमनाथ, नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये ‘नॅशनल कॉन्फरेन्स फॉर रिसर्च स्कॉलर्स ऑफ भारतीय शिक्षण मंडळ युवा आयाम, विविभा २०२४’ कार्यक्रमात पुस्तकाचे प्रकाशन पार पडले होते.

 

Exit mobile version