नवरात्री २२ मार्चपासून सुरु होत आहे. नवरात्रामध्ये माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. दर्शनाला आल्यावर रहावे कुठे असाही प्रश्न भाविकांना पडतो. पण आता चिंता करण्याची गरज नाही. माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.वैष्णोदेवी येथे भाविकांसाठी बांधण्यात आलेलं दुर्गा भवन आता सज्ज झाले आहे. जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी दुर्गा भवनाचे उद्घाटन केले आहे. दुर्गा भवनांमुळे भाविकांची मोठ्या प्रमाणावर राहण्याची सोय झाली आहे.
सुमारे २७ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या दुर्गा भवनामध्ये दररोज २,५०० भाविकांना मोफत राहता येईल. चैत्र नवरात्र सुरु होण्याच्या आधीच विक्रमी वेळेत हे दुर्गा भवन बांधून पूर्ण करण्यात आले आहे. इमारत बांधून पूर्ण करण्यासाठी १९ महिने लागले. त्यामुळे दुर्गा भवनाची पुनर्बांधणी आगामी काळात विशेषत: नवरात्रीपासून भाविकांसाठी खूप उपयुक्त ठरेल असे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा:
एक तास आधी या, तासभर आधी निघा…बिहार सरकारची मुस्लिम कर्मचाऱ्यांसाठी रमझानची सवलत
अखेर लाल वादळ शमलं, शेतकरी मोर्चा स्थगित
खलिस्तानचा खरा शत्रू भारत नसून पाकिस्तान!
मराठी चित्रपटात महत्त्वाचे योगदान देणारे प्रसिद्ध अभिनेते भालचंद्र कुलकर्णी कालवश
गर्दी नियंत्रण व्यवस्थापनाच्या दृष्टीने जवळपास २,००० भाविकांच्या गर्दीचे नियंत्रन करण्याची क्षमता आता येथे आहे. त्याची क्षमता २,००० प्रवाशांची आहे. इमारतीत चार लिफ्ट आहेत. ही इमारत ५ मजली इमारत ७०,००० चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेली आहे. इमारतीमध्ये चार लिफ्ट, वॉशरूम, लॉकर्स, ब्लँकेट स्टोअर, रेस्टॉरंट तसेच वसतिगृहे आणि खोल्या आहेत आणि प्रत्येक मजल्यावर दिव्यांग यात्रेकरूंसाठी विशेष शौचालये बांधण्यात आली आहेत.
मुख्य इमारत संकुल, कालिका भवन, नवीन कालिका भवन, वैष्णवी आणि गौरी भवन, मनोकामना भवन येथेही भाविकांची राहण्याची व्यवस्था आहे. इयेथे भाविकांना अगोदर बुकिंग केल्यानंतर भाडे दराने या निवासी इमारतीमध्ये राहता येते.