उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यातील राणीपूर या गावात ७० वर्षे जुन्या मंदिराच्या जीर्णोद्धाराला गावातील इस्लामी कट्टरवाद्यांनी विरोध केल्याचे वृत्त आहे.
हे गाव बिघापूर कोतवालीच्या निबई चौकीच्या अंतर्गत येते. सदर मंदिराच्या छपराचे काम सुरू करण्यात आले होते. त्यावेळी निहाल, अनीस खान, असगर खान, सलीम, युनूस, शोएब, रईस व अच्छे यांनी हे काम थांबवायला लावले. या जीर्णोद्धारामुळे नमाज पढण्यात अडसर येत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. कारण मशीद केवळ १०० मीटर लांब अंतरावर आहे, असे कारण देण्यात आले.
राणीपूर हे गाव मुस्लिम बहुल आहे. यात १३० घरे ही मुस्लिमांची आहेत तर ३० घरे ही हिंदूंची आहेत. मंदिर निर्माणात अडसर केल्यामुळे पोलिसांनी २६ मुस्लिम आणि ६ हिंदूंना ताब्यात घेतले. पण यानंतरही सोशल मीडियावर हे प्रकरण चर्चेत आले.
हे ही वाचा:
सीमावाद निवळणार; प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या मुद्द्यावरून भारत- चीनमध्ये झाला करार
जम्मू काश्मिरात कामगारांची हत्या ‘द रेझिस्टंट फ्रंट’ने घडवली!
जम्मू काश्मिरात कामगारांची हत्या ‘द रेझिस्टंट फ्रंट’ने घडवली!
सदर भागातील पोलिस अधिकारी ऋषिकांत शुक्ल यांनी सांगितले की, धार्मिक स्थळाचे काम करण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. त्यासाठी संबंधितांकडून परवानगी घेण्यास सांगण्यात आले आहे. प्रशासनाची परवनगी मिळाल्यानंतर मंदिराचे काम पूर्ण करता येईल.