हिंदू पौराणिक कथेनुसार, सतीच्या शरीराचे अवयव, वस्त्र किंवा दागिने जिथे जिथे पडले तिथे शक्तीपीठे अस्तित्वात आली. ही शक्तिपीठे भारतात तर आहेतच पण भारताच्या शेजारील देशांमध्येही आहेत. तिथेही या शक्तीपीठांना महत्त्व आहे. भाविकांची श्रध्दा आहे. तिबेटमध्येही शक्तीपीठ आहे. मनसा शक्तीपीठ या नावाने हे ओळखले जाते.
प्रसिद्ध अशा मानस सरोवराजवळ मनसा देवीचे स्थान आहे. मानसरोवराच्या नैऋत्येकडे असलेल्या कुग्गु नावाच्या ठिकाणी देवी सतीचा उजवा तळहात पडल्याचे मानले जाते. हे ठिकाण समुद्र सपाटीपासून साधारण २१ हजार फूट उंचीवर आहे. या शक्तीपीठाला माँ दक्षिणायनी शक्तीपीठ म्हणूनही ओळखले जाते. कैलास पर्वताला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
कैलास पर्वताच्या मार्गावर सुप्रसिद्ध गौरी कुंड किंवा पार्वती सरोवर आहे. देवी पार्वतीने भगवान गणेशाला जन्म दिला आणि स्नान करत असताना त्याला रक्षक म्हणून उभे केले. मात्र, गणेशाने भगवान शिवाला पार्वतीला भेटण्यापासून रोखले आणि रागाच्या भरात भगवान शिवाने गणेशाचा शिरच्छेद केला. त्यानंतर चिंताग्रस्त पार्वतीने भगवान शिवाला गणेशाला क्षमा करण्याची आणि त्याला पुन्हा जिवंत करण्याची विनंती केली., हे तेच तलाव आहे असे मानले जाते.
मनसा देवीला दाक्षायणी (दुर्गा) म्हणून ओळखले जाते. तर भगवान शिवाचे नाव अमर (अमर) म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी कोणतेही मंदिर किंवा देवता नसून एका मोठ्या शिळेची मनोभावे पूजा केली जाते. भारत, नेपाळ, चीन अशा अनेक देशांमधून भाविक मानस सरोवराला भेट देत असतात.
हे ही वाचा:
‘आदिपुरूष’ सिनेमाच्या टीझर रिलीजसाठी प्रभास, क्रिती पोहचले अयोध्येत
भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दल ‘या’ १० खास गोष्टी माहित आहेत का?
नवरात्री २०२२ : हिंगलाज माता पाकिस्तानातील एकमेव शक्तीपीठ
विमानतळावर ‘श्रीराम’ दिसले आणि…
पवित्र मानसरोवर तलावात स्नान करून शिखराची प्रदक्षिणा केल्यास पिढ्यानपिढ्या पापमुक्त होऊन मोक्षप्राप्ती होते, असं मानलं जातं. हे संपूर्ण पृथ्वीवरील शुद्ध आणि आध्यात्मिक ठिकाणांपैकी एक आहे जिथे लोक त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतात, अशीही समज आहे.