पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा एक व्हीडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे. बंगालमधील एका गरब्याच्या कार्यक्रमात ममता बॅनर्जीही सहभागी झाल्या आहेत. पण त्यात प्रत्यक्ष नृत्यात सहभागी न होता, बाजुला उभ्या राहून त्या गरब्याचा आनंद घेत आहेत. पश्चिम बंगालमध्ये दुर्गाउत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. ममता बॅनर्जी यांनीही अशाच एका उत्सवाला भेट दिली होती.
या व्हीडिओत दिसते आहे की, ममता बॅनर्जी या एका बाजुला उभ्या राहून हातात टिपऱ्या धरून केवळ हात गोल गोल फिरवत आहेत, टिपऱ्या एकमेकांवर आपटत आहेत, मात्र त्यात त्या जागेवरून जराही हलत नाहीत. त्यांच्यासमोर काही लोक हे फेर धरून नाचत आहेत. गरब्याचे संगीत लागले आहे आणि त्याच्या ठेक्यावर लोक गरब्याचा आनंद घेत आहेत. पण ममता बॅनर्जी मात्र त्यात सहभागी झालेल्या नाहीत.
सध्या देशभरात नवरात्रीचा उत्सव सुरू आहे. त्यानिमित्त विविध राजकीय पक्षांकडून गरब्यांचे आयोजन केले जात आहे. शिवाय, अनेक राजकीय नेतेही या गरब्यांत सामील होत आहेत. काही राजकीय नेत्यांनी गरब्यात प्रत्यक्ष सहभागी होत नृत्याचा आनंद घेतला आहे तर काही नेते ड्रम्स, ढोल वाजवत त्यात सहभाग घेत आहेत.
हे ही वाचा:
मुंबई विमानतळावर महिलेकडून कोकेन जप्त
काँग्रेसचा अध्यक्ष, अध्यक्ष खेळ सुरूच
ग्राहकांनो आता वर्षभरात मिळणार एवढेच सिलिंडर
पुष्पा स्टाईलने चंदनाची चोरी करणारा अटकेत
त्यामुळेच ममता बॅनर्जी यांचा हा व्हीडिओ व्हायरल होत आहे. त्या जणू काही सक्तीने कुणीतरी त्यांना बाहेर उभे केल्याप्रमाणे टिपऱ्या गोल गोल फिरवताना दिसत आहेत. मागे त्यांचा एक कीबोर्ड वाजवतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. आता या व्हीडिओमुळे ममता बॅनर्जी पुन्हा चर्चेत आल्या आहेत.
एका नेटकऱ्याने या व्हीडिओवर प्रतिक्रिया दिली होती की, आता इथे एखादे विमान लँड होणार आहे अशा पद्धतीनेच ममतादीदी त्या विमानचालकाला इशारा तर करत नाहीत ना?