तमिळ आणि मल्याळम दिग्दर्शक अली अकबर यांनी इस्लाम धर्म सोडण्याचा निर्णय घेतला असून लवकरच ते आणि त्यांच्या पत्नी लवकरच हिंदू धर्म स्वीकारणार आहेत. सीडीएस बिपीन रावत यांच्या अपघाती निधनानंतर काही कट्टरपंथीयांकडून आनंद साजरा करण्यात आला. त्यामुळे केरळमधील मल्याळम चित्रपटांचे दिग्दर्शक आली अकबर अकबर खूप दुखावले गेले आहेत म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
अली अकबरने बिपिन रावत यांच्या हौतात्म्यावरुन एक फेसबुक लाइव्ह केले होते. ज्यावर काही कट्टरपंथीयांनी हसणारे इमोजी टाकले होते. लोकांच्या या वृत्तीने आपल्या भावना दुखावल्या गेल्याचे सांगत त्यांनी फेसबुक लाईव्हवर येऊन याबाबत चर्चा केली. बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहताना अली अकबर म्हणाले की, “हे कधीही स्वीकारले जाऊ शकत नाही आणि म्हणूनच मी माझा धर्म सोडत आहे. आजपासून मी मुस्लिम नाही. मी भारतीय आहे,” असे ते म्हणाले.
हे ही वाचा:
… म्हणून ३०० मिनिटांसाठी एसबीआयच्या इंटरनेट सेवा राहणार बंद
एमआयएमची तिरंगा रॅली मुंबईच्या दिशेने
सुप्रिया ताईंची शिकवणी न घेतल्याने नवाब मलिक नापास
सीडीएस बिपिन रावत यांना लष्करी सन्मानात निरोप, १७ तोफांची दिली सलामी
अली अकबर यांनी सीडीएस बिपिन रावत यांच्या मृत्यूची खिल्ली उडवणाऱ्या इस्लामवाद्यांवर टीका करणारा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला होता. व्हिडिओवर आक्षेपार्ह कमेंटमुळे अकबर यांचे खाते एका महिन्यासाठी निलंबित करण्यात आले. त्यानंतर अली अकबर यांनी दुसरे खाते उघडून त्यावर इस्लाम सोडत असल्याचे जाहीर केले.
कुराणातील २६ आयती काढून टाकण्याची मागणी करणारी याचिका वासिम रिझवी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती, ती फेटाळण्यात आली होती. तेव्हापासून कट्टरपंथी मुस्लीम अनेकदा वसीम रिझवी यांना लक्ष्य करत असतात. कोर्टात सुरू असलेला खटला, सतत येणाऱ्या धमक्या यामुळे रिझवी यांनी काही दिवसांपूर्वी इस्लामचा त्याग करून हिंदू धर्म स्वीकारला.