शेवडे, पोंक्षे आणि मांजरेकर एकत्र…नेमकं काय शिजतंय?

शेवडे, पोंक्षे आणि मांजरेकर एकत्र…नेमकं काय शिजतंय?

महेश मांजरेकर, शरद पोंक्षे आणि डॉ.सच्चिदानंद शेवडे ही तिन्ही नावे महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. मांजरेकर आणि पोंक्षे ही अभिनय क्षेत्रात कार्यरत असणारी दोन नामवंत व्यक्तिमत्त्वे तर सच्चिदानंद शेवडे हे आपल्या अमोघ वाणीने प्रखर विचारांनी देश-विदेशात प्रबोधन करत असतात. पण आता हे तिघेही जण एकत्र येताना दिसत आहेत.

सच्चिदानंद शेवडे यांचे चिरंजीव वैद्य परिक्षित शेवडे यांनी सोमवार, ३ जानेवारी रोजी आपल्या फेसबुक खात्यावरून ही माहिती दिली आहे. परिक्षीत यांनी या तिघांचाही फोटो फेसबुक वर पोस्ट केला आहे. तर त्या सोबत “शेवडे, पोंक्षे आणि मांजरेकर एकत्र…….काहीतरी शिजतंय!” असे कॅप्शन दिले आहे. त्यामुळे या तिघांमध्ये नेमके काय शिजतंय? याची चर्चा रंगताना दिसत आहे.

हे ही वाचा:

तालिबानचे दारू’बॅन’; कालव्यात ओतले हजारो लीटर मद्य

मविआ सरकारच्या काळात चौथीच्या पुस्तकात इस्लामी शिकवण

मंदिराच्या दारात लटकवले गोमांस

आम्हाला जगू द्या, मारू नका! म्हणण्याची वेळ आली पुण्यातल्या शिवसेनेवर

भेटीचे कारण सावरकर की नथुराम?
चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर हे आगामी काळात स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नथुराम गोडसे या दोन ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांवर चित्रपट घेऊन येत आहेत. या दोन्ही चित्रपटांची घोषणाही झाली आहे. सावरकर आणि नथुराम या दोन्ही ऐतिहासिक व्यक्तिमत्वांशी शरद पोंक्षे आणि शेवडे या दोघांचाही खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे या चित्रपटांच्या निमित्तानेच ही भेट झाली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण ही भेट सावरकर चित्रपटासाठी होती की नथुरामसाठी की दोन्हीसाठी हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या संबंधी सच्चिदानंद शेवडे यांच्याशी संपर्क साधला असता ‘लवकरच काहीतरी येणार आहे. जे येईल ते चांगलेच असेल. पण त्यासाठी थोडी कळ सोसावी लागेल’ अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘न्यूज डंका’शी बोलताना दिली आहे.

Exit mobile version