ठाकरे सरकारच्या हिंदू विरोधी फतव्याला केराची टोपली दाखवत राज्यात होळीचा उत्साह

ठाकरे सरकारच्या हिंदू विरोधी फतव्याला केराची टोपली दाखवत राज्यात होळीचा उत्साह

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अतिउत्साहात साजरा होणारा होळीचा सण किंवा शिमगोत्सवाव रविवारी पार पडला. कोरोनाचे कारण पुढे करत ठाकरे सरकारने हा होळीचा सण साजरा करण्याच्या विरोधात तुघलकी फतवा काढत बंदी घातली होती. पण राज्याच्या जनतेने ठाकरे सरकारच्या नावे बोंब ठोकत ह्या फतव्याला केराची टोपली दाखवली. राज्यभरात प्रचंड उत्साहात होलिकोत्सव साजरा केला गेला.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाचा हा आकडा नियंत्रित करण्यात आणि परिस्थिती सावरण्यात ठाकरे सरकार पहिल्यापासूनच अपयशी ठरले आहे. पण आपल्या अपयशाचे खापर राज्यातील जनतेवर फोडले जात आहे. रविवारी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही गोष्ट बोलून दाखवली. अशातच सरकारने शब-ए-बारात साठी विशेष नियमावली जाहीर करत होळीवर मात्र बंदी घालण्याचा निर्णय घेतला. हिंदू सणांच्या बाबतीत कायमच अशी भूमिका घेणाऱ्या ठाकरे सरकारला राज्यातील जनतेने मात्र सरकारच्या ह्या फतव्याला झुगारून आपली परंपरा जोपासत होळीचा सण साजरा केला. यावेळी लोकांनी कोविड नियमावलीचा भंग होणार नाही याची काळजी घेत योग्य ती खबरदारी घेतली.

हे ही वाचा:

मिठी नदीतून सापडले सचिन वाझेच्या पापाचे पुरावे

कम्युनिस्ट नेत्याच्या हत्येसाठी तृणमूल नेत्याला अटक

वाझेचा साथीदार धनंजय गावडेची अटक आता अटळ

लॉकडाऊनच्या तयारीला लागा…मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश

भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनीदेखील ठाकरे सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवत, परंपरा जपत, श्रद्धेला बळकटी देत होलिकोत्सव साजरा केला. याचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत त्यांनी ठाकरे सरकारला खडे बोल सुनावले.

Exit mobile version