सध्या महाराष्ट्रात होळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. होळी आणि धूलिवंदन या सणाच्या निमित्ताने नागरिक तयारी करताना दिसत आहेत. पण अशातच ठाकरे सरकारने होळीच्या निमित्ताने नवी नियमावली जारी केली आहे. राज्यातील पोलिसांनी ही नियमावली जाहीर केली आहे. या नियमांनुसार होळी पेटवण्यासाठी वेळेची मर्यादा असणार आहे. तर डीजीवरही बंदी घालण्यात आली आहे.
गुरुवार, १७ मार्च रोजी राज्यात सर्वत्र होलिका दहन साजरा केले जाणार आहे. तर शुक्रवार, १८ मार्च रोजी धुळवड खेळली जाणार आहे. पण अजूनही कोविडचे संकट पूर्णपणे टळलेले नाही. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक नियमावली या सणांच्या निमित्ताने जरी करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार होळी पेटवण्यासाठी रात्री १० वाजताची मर्यादा ठरवण्यात आली आहे. तर होळी साजरी करताना आणि धुळवडीच्या दिवशी डीजेवर बंदी घालण्यात आली आहे. याचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
हे ही वाचा:
नवाब मलिकांना दणका; ईडी फराझ मलिकला तिसरं समन्स पाठवणार
माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे निधन
आजपासून १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण
आसाम मधील सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार काश्मीर फाईल्स पाहण्यासाठी अर्ध्या दिवसांची सुट्टी
तर या व्यतिरिक्त लाऊड स्पीकरच्या वापरावरही मर्यादा असणार आहेत. राज्यात सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु असल्यामुळे मोठ्या प्रमाणात लाऊड स्पीकरचा आवाज ठेवण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. या सोबतच धार्मिक भावना दुखावतील अशा कोणत्याही घोषणा देऊ नयेत असे सांगण्यात आले आहे.
या वर्षी होलिका दहनाचा मुहूर्त ९.०६ से १०.१६ या कालावधीत आहे. या १ तास १० मिनिटांच्या काळात होळी पेटवली जाणार आहे. कोकणात प्रामुख्याने शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.