अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर उभे राहत आहे. या मंदिर उभारणीच्या संघर्षात अनेक कारसेवकांचे आणि श्रीरामभक्तांचे योगदान लाभले आहे. येत्या २२ तारखेला प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानिमित्ताने देशभरातून राम मंदिरासाठी अनेकांनी सढळ हस्ते आर्थिक देणग्या दिल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या वतीने व महाराष्ट्रवासियांच्या वतीने ११ कोटी रुपयांचा धनादेश राम जन्मभूमी मंदिर न्यासाकडे सुपूर्द केला आहे.
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव चंपतराय यांच्याकडे हा धनादेश ६ जानेवारी २०२४ रोजी सुपूर्द करण्यात आला. यावेळी राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश म्हस्के, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, आशिष कुलकर्णी उपस्थित होते.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करणारे मालदीवचे तीन मंत्री निलंबित
मालदीव मंत्र्यांच्या आक्षेपार्ह टिप्पणीबाबत स्थानिक नेत्यांमध्येच रोष
वसंत मार्वलमध्ये अय्यप्पा पूजनातून एकात्मतेचा संदेश
‘श्री राम घर आये’ गाण्याने पंतप्रधान मोदी प्रभावित!
ह्या वेळी विश्व हिन्दू परिषदेचे अखिल भारतीय संघटन महामंत्री विनायकराव देशपांडे, विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्र संपर्क प्रमुख संजय ढवळीकर हे उपस्थित होते. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महामंत्री यांच्यासोबत न्यासाचे विश्वस्त डॉ अनिल मिश्रा, आणि न्यासाचे श्री गोपालजी हे उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांच्याकडून राम मंदिरासाठी १ कोटीची देणगी दिल्याचे संजय राऊत यांनी मध्यंतरी जाहीर केले होते. पण आता शिवसेना हा पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या पक्षाच्या वतीने ही ११ कोटींची देणगी दिली आहे.