भक्ती आणि श्रद्धेचा महाकुंभ माउलींच्या चरणी

आषाढी एकादशी; हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र तिथी

भक्ती आणि श्रद्धेचा महाकुंभ माउलींच्या चरणी

मुख दर्शन व्हावे आता

तू सकल जगाचा त्राता

घे कुशीत गा माऊली तुझ्या

पायरी ठेवतो माथा

माऊली माऊली माऊली माऊली

विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल

आषाढी एकादशी म्हटले की डोळ्यासमोर उभी राहते ती पंढरपूरची वारी. विठुरायाच्या भेटीसाठी आसुसलेली नजर, माथी तुळशी वृंदावन, टाळ वाजवत आणि मुखात माउलींच्या नामाचा गजर करत हजारोंच्या संख्येने वारकरी पंढरपूरकडे चालत निघालेले असतात. वर्षभरातील २४ एकादशांमध्ये आषाढी एकादशीला खास महत्त्व आहे. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला ‘देवशयनी’ (देवांच्या निद्रेची) आणि वद्य पक्षातील एकादशीला ‘कामिका एकादशी’ असे म्हणतात. आषाढी एकादशी ही हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र तिथी आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि विशेषतः महाराष्ट्रात पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिरात लाखो भक्तांची गर्दी होते.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने भाविक विठ्लाच्या दर्शनासाठी या दिवशी पंढरपुरात येतात. भगवान विष्णूचा अवतार म्हणून विठ्ठलाला ओळखले जाते. या दिवसापासून भगवान विष्णूची निद्रावस्था सुरु होते. त्यामुळे विठ्ठल भक्त पंढरपुरात जाऊन विठू माऊलीचा आशीर्वाद घेतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतले जाते. या दिवशी व्रत ठेवले जाते आणि उपवास करून भक्त भगवान विष्णूची उपासना करतात.

हे ही वाचा:

कवी नारायण सुर्वेंच्या घरात केली चोरी पण, नंतर चोर चिठ्ठी लिहित म्हणाला सॉरी…

काँग्रेसचे हिरामण खोसकर नाना पटोलेंवर संतापले!

विकासशील इंसान पार्टीचे प्रमुख मुकेश साहनी यांच्या वडिलांची हत्या

डोंबिवलीहून पंढरपूरकडे निघालेल्या बसचा अपघात; पाच भाविकांचा मृत्यू

वारी म्हणजे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची एक अत्यंत महत्त्वाची धार्मिक यात्रा आहे. या वारीत हजारो वारकरी पंढरपूरकडे जातात आणि विठोबाच्या चरणी माथा टेकवतात. पंढरपूरची वारी ही भक्ती आणि श्रद्धेचा महाकुंभ आहे ज्यात वारकरी, महिला, मुले आणि वृद्ध सर्वजण उत्साहाने सहभाग घेतात. वारीमधून सामाजिक समरसता आणि एकतेचे महत्त्व स्पष्ट होते. वारकरी संप्रदायात कोणत्याही जाती, धर्म, किंवा वर्गाचा भेदभाव नसतो. सर्वजण एकत्र येऊन विठोबाच्या भक्तीत लीन होतात.

Exit mobile version