रामटेकमध्येच महाकवी कालिदासांच्या पदरी उपेक्षा!

रामटेकमध्येच महाकवी कालिदासांच्या पदरी उपेक्षा!

आषाढाचा प्रथम दिवस आपण महाकवी कालिदास यांचा दिन म्हणून साजरा करतो. आषाढस्य प्रथम दिवसे म्हटले की, आपल्याला कालिदासांच्या ओळी आठवतात. परंतु एवढी अफाट आणि महाकवी व्यक्तीच्या नावे असलेल्या रामटेकमधील कालिदास स्मारकाची अवस्था ही सध्या अधिकच बिकट झालेली आहे.

ठाकरे सरकारने याकडे आता गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. कालिदासांचे स्मरणबंध कायमस्वरुपी आपल्यासोबत राहावेत म्हणून, १९७३ साली कालिदासांचे स्मारक नागपूरात उभारण्यात आले. परंतु सद्यस्थितीमध्ये या स्मारकाची रया गेलेली आहे. लोकमत मध्ये आलेल्या बातमीनुसार आजच्या घडीला इथला बगिचा अक्षरशः उजाड झालेला आहे. तसेच संगीत कारंजेही बंद पडले आहे. भित्तीचित्रे नीरस झाले असून, वीजपुरवठाही काही दिवसांपूर्वी याठिकाणी नव्हता.

महाकवी कालिदास हे आपल्या देशातील सर्वोत्तम कवी म्हणून ओळखले जातात. केवळ इतकेच नाही, तर महाकवी कालिदासांचे महाकाव्य म्हणजे उत्कृष्ट काव्याचा नमुना म्हटले जाते. खासकरून विरह हा त्यांच्या काव्याचा महत्त्वाचा भाग आहे.

कालिदासांनी आयुष्यभर अनुभवलेला प्रेमविरह आपल्या सर्वांच्या चांगलाच परिचयाचा आहे. कालिदासांच्या ओळी आजही आपल्या मनावर केवळ कोरल्याच गेल्या नाहीत. तर अनेक ओळी आपल्या मनावर अजरामर झालेल्या आहेत. अशा व्यक्तीच्या स्मारकास ही उपेक्षा मिळावी हे आपले दुर्भाग्य आहे.

हे ही वाचा:
नाना पटोलेंसारख्या ‘लहान माणसा’ला शरद पवारांचा टोला

‘उज्ज्वल’ भविष्यासाठी शिवसेना प्रयत्नशील?

अफगाणिस्तानमध्ये धोका; भारतीय अधिकाऱ्यांना आणले माघारी

दहशतवाद्यांना मदत कराल तर याद राखा!

जयपुरी दगडात हे स्मारक बांधले असून ही अतिशय सुंदर वास्तु आहे. परंतु सध्याच्या घडीला मात्र याची अतिशय वाईट अवस्था झालेली आहे. केवळ इतकेच नाही तर टाइल्सच्या तुकड्यांमधून कालिदासांच्या नाटकातील प्रसंगही येथे रेखाटलेले आहेत. सर्व सुंदर करून हे नगरपरिषदेकडे सुपूर्द केले. परंतु नगरपरिषदेच्या उदासिनतेमुळे मात्र हे स्मारक अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये सद्यस्थितीमध्ये आहे. नगरपरिषद आणि शासन यांनी मिळून हे स्मारक एका जागतिक कीर्तीच्या मान्यतेला आणुन ठेवले असते. परंतु शासनदरबारी मात्र अनेक चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्षच होत आहे.

Exit mobile version