वाराणसीच्या धर्तीवर गोदावरीवर होणार महाआरती

केंद्राकडून ५ कोटी रुपयांचा निधी

वाराणसीच्या धर्तीवर गोदावरीवर होणार महाआरती

नाशिकच्या रामकुंडाचा कायापालट होणार असून अयोध्या, वाराणसी आणि हरिद्वारच्या धर्तीवर आता नाशिकच्या गोदावरी नदीवरही दररोज महाआरती होणार आहे. केंद्र सरकारने यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यासंदर्भात पंचायत सिद्धपीठाचे महंत अनिकेत शास्त्री यांनी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे अखेर गोदावरी नदीवर महाआरती करण्यासाठी रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

गंगा नदी पवित्र नदी म्हणून ओळखली जाते. गंगा नदीलाही धार्मिक महत्त्व आहे. त्याचप्रमाणे नाशिक शहरातून वाहणारी गोदावरी नदी ही दक्षिण भारताची गंगा म्हणूनही ओळखली जाते. गोदावरी नदी ही गंगा नदीसारखी धार्मिक महत्त्व असलेली महत्त्वाची नदी आहे. नाशिकमध्येही कुंभमेळा भरतो आणि येथे विसर्जनासाठी देशभरातून भाविक आणि अनेक नागरिक येतात. त्यामुळे नाशिकच्या रामकुंड परिसरात गंगेप्रमाणे दररोज महाआरती होणार आहे. त्यामुळेच सरकारने आता या महाआरतीसाठी निधी मंजूर केला आहे.

या महाआरतीसाठी शासनाकडून ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नियोजन करून लवकरच आरती सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. नाशिकचे महंत अनिकेत शास्त्री महाराज यांनी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे अखेर गोदावरी नदीवर महाआरती करण्यासाठी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. त्यानुसार रामकुंड परिसरात दररोज महाआरती होणार आहे.

हे ही वाचा :

क्रोएशियातही आता मल्लखांब रोवला!

विनयभंगप्रकरणी आव्हाडांना अटकपूर्व जामीन मंजूर

प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय असले पाहिजे

हेमंत सोरेन चौकशीला या! ईडीने पाठवले दुसरे समन्स

गंगा आरती पाहण्यासाठी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही लोक येतात. ही आरती पर्यटकांसाठीही आकर्षणाचा विषय आहे. इतकेच नव्हे तर गंगा आरती पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक अयोध्या, वाराणसी आणि हरिद्वार सारख्या ठिकाणी भेट देत असल्याने भक्ती गंगा आरती हा देखील पर्यटकांसाठी पर्यटनाचा एक विशेष भाग आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. त्याच धर्तीवर नाशिकमध्येही दररोज गोदावरी नदीची महाआरती होणार आहे. यानिमित्ताने नाशिकच्या पर्यटनालाही चालना मिळू शकेल, अशी अपेक्षा काही नागरिक व्यक्त करत आहेत.

Exit mobile version