प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळाव्याला प्रारंभ; ४५ कोटी भाविक उपस्थित राहण्याची शक्यता!

त्रिवेणी संगमात स्नान करण्यासाठी भारतातूनच नव्हे तर जगभरातून भाविक प्रयागराजमध्ये येण्यास सुरुवात

प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळाव्याला प्रारंभ; ४५ कोटी भाविक उपस्थित राहण्याची शक्यता!

जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा म्हणून ओळख असलेल्या महाकुंभ मेळ्याला सोमवारी (१३ जानेवारी) उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरुवात झाली. भाविकांनी पौर्णिमेच्या पहिल्या शाही स्नानाच्या निमित्ताने भाविकांनी गंगा नदीत स्नान केले. सरकारी आकडेवारीनुसार, सोमवारी सकाळी ८ वाजता सुमारे ४० लाख भाविकांनी त्रिवेणी संगमात स्नान केले. गंगा, यमुना आणि गूढ सरस्वती नद्यांच्या संगमावर १४४ वर्षांनंतर होत असलेला ४५ दिवसांचा महाकुंभ सुरू झाला असून या मेळाव्याला ४५ कोटींहून अधिक भाविक भेट देतील अशी अपेक्षा आहे. त्रिवेणी संगमात स्नान करण्यासाठी केवळ भारतातूनच नव्हे तर जगभरातून लोक प्रयागराजमध्ये येऊ लागले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रयागराजमध्ये येणाऱ्या भाविकांचे स्वागत केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर म्हटले आहे की, “भारतीय मूल्ये आणि संस्कृतीचे जतन करणाऱ्या करोडो लोकांसाठी हा एक अतिशय खास दिवस आहे. प्रयागराजमध्ये महाकुंभ २०२५ ची सुरुवात होत आहे. असंख्य लोकांना श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीचा महाकुंभ असलेल्या एका पवित्र संगमात एकत्र आणले जात आहे. महाकुंभ मेळावा हा भारताच्या अध्यात्मिक वारशाचे दर्शन घडवतो.”

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही भक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत. “पौष पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेळावा ‘महाकुंभ’ आजपासून पवित्र शहरात प्रयागराजमध्ये सुरू होत आहे. सर्व पूज्य संत, कल्पवासी आणि भक्तगण जे विविधतेत एकता अनुभवण्यासाठी, ध्यान करण्यासाठी आणि पवित्र स्नान करण्यासाठी आले आहेत त्यांच्या इच्छा पूर्ण होवोत.”

भव्य, दिव्या अशा महाकुंभ मेळाव्यापूर्वी राज्याचे मुख्य सचिव मनोज कुमार सिंह यांनी सर्व व्यवस्थेचा आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश दिले आहेत. २०१९ चा कुंभ होता. हा महाकुंभ आहे. गेल्या कुंभात २४ कोटी भाविक आले होते आणि यावेळी १५ लाख परदेशी पर्यटकांसह ४५ कोटींहून अधिक भाविक येण्याची अपेक्षा आहे. तशी व्यवस्थाही केली जात आहे, अशी माहिती मनोज कुमार सिंह यांनी केली आहे. पुढे ते म्हणाले की, या ४५ दिवसांच्या भव्य मेळाव्यासाठी राज्याचे बजेट सुमारे सात हजार कोटी रुपये इतके आहे. यापूर्वीचा कुंभ हा स्वच्छतेसाठी ओळखला जात होता. यावेळी महाकुंभ स्वच्छता, सुरक्षा आणि डिजिटल कुंभ असणार आहे. महाकुंभ यशस्वी करण्यासाठी आणि भाविकांना समाधानकारक अनुभव देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकारी एक टीम म्हणून काम करत आहेत, असे सिंह म्हणाले.

हे ही वाचा : 

छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये पाच नक्षलवाद्यांना यमसदनास धाडले; शस्त्रे केली जप्त!

प्रतितास दोन लाख भाविक अमृत स्नान करणार; संगम त्रिवेणी क्षेत्रात वाढ

महाकुंभात पोहोचल्या स्टीव्ह जॉब्सच्या पत्नी, स्वामींनी नवे नाव आणि गोत्रही दिले.

राजमाता जिजाऊ माँ साहेबांची जयंती उत्साहात साजरी

महाकुंभ २०२५ मध्ये भाविकांची सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आधुनिक गॅझेटच्या तैनातीसह तंत्रज्ञान आणि अध्यात्माचा अनोखा मिलाप पाहायला मिळत आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रथम एक अंडरवॉटर ड्रोन तैनात करण्यात आला आहे, जो २४ तास पाण्याखालील प्रत्येक हालचालींवर नजर ठेवण्यास सक्षम आहे. याशिवाय, AI-सक्षम कॅमेरे, PAC, NDRF आणि SDRF च्या टीम्स ७०० ध्वजांकित बोटींवर तैनात करण्यात आल्या आहेत ज्यामुळे भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित झाली आहे. प्रसिद्ध गायक कैलाश खेर, शंकर महादेवन, कविता कृष्णमूर्ती आणि इतर अनेक माननीय कलाकार महाकुंभाच्या दरम्यान प्रयागराजमध्ये सादरीकरण करणार आहेत.

Exit mobile version