राज्यात आंतरजातीय विवाह समिती स्थापन होणार आहे. येत्या सात दिवसांमध्ये ही समिती स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे. तसेच श्रद्धा वालकरच्या हत्येनंतर ‘लव्ह जिहाद’ कायद्याची चर्चा सुरु झाली. महाराष्ट्रात लवकरचं लव्ह जिहाद कायदा लागू होईल, असे म्हटले जातं आहे.
देशातील काही राज्यांमध्ये लव्ह जिहाद कायदा लागू आहे. लव्ह जिहादचा कायदा उत्तर प्रदेश, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये लागू आहे. उत्तर प्रदेशमध्ये २०२० साली हा कायदा लागू झाला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये या कायद्यांतर्गत दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या कायद्यामध्ये केवळ लग्नासाठी केलेले धर्मांतर अमान्य आहे. खोटं बोलून, धोका देऊन झालेलं धर्मांतर हा गुन्हा आहे. ज्या प्रकरणांमध्ये स्वेच्छा धर्मांतर करावयाचे आहे त्या प्रकरणात दोन महिने अगोदर मॅजिस्ट्रेटना माहिती द्यावी लागेल. या गुन्ह्यांतर्गत १५ हजार रुपयांच्या दंडासह शिक्षेची तरतूद आहे.
हे ही वाचा :
बुलेट ट्रेनसाठी खारफुटीची झाडे तोडण्यास न्यायालयाचा हिरवा कंदिल
रेल्वेचा कुली; पण गरिबांचा शिक्षक
इशान किशनने पाडला बांगलादेशमध्ये पाऊस, १२६ चेंडूंत २०० धावांचा विश्वविक्रम
शुक्रवारी श्रद्धा वालकरच्या वडिलांची पत्रकार परिषद पार पडली. त्यांनी सुद्धा यावेळी धर्मजागरण गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्यासोबत यावेळी भाजपा नेते किरीट सोमय्या हे उपस्थित होते. त्यानंतर आज मंगल प्रभात लोढा यांनी राज्यात आंतरजातीय विवाह समिती स्थापन करणार असल्याची माहिती दिली आहे. एकूणच श्रद्धा वालकर हत्येमुळे राज्यात अशा कायद्यांचा गंभीरपणे विचार केला जातं आहे.