होय ‘लव्ह जिहाद’ आहे… न्यायालयाने केले शिक्कामोर्तब

बरेली न्यायालयाने ठोठावली आनंद बनलेल्या आलीमला कठोर शिक्षा

होय ‘लव्ह जिहाद’ आहे… न्यायालयाने केले शिक्कामोर्तब

आनंद हे हिंदू नाव धारण करून एका अल्पवयीन मुलीला फसवून लग्न करणाऱ्या नंतर धर्मपरिवर्तनासाठी जबरदस्ती करणाऱ्या आलीम नावाच्या तरुणाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

या अतिरिक्त न्यायालयाचे न्यायाधीश रविकुमार दिवाकर यांनी हे लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचे स्पष्टपणे नमूद केले असून या प्रकारामुळे समाजस्वास्थ्याला धोका निर्माण झाल्याचेही मत न्यायाधीशांनी व्यक्त केले. मुस्लिम व्यक्ती या पद्धतीने खोटे नाव धारण करून तरुणींना लग्नासाठी प्रवृत्त करत असून त्यांना प्रेमाच्या नावाखाली धर्मांतरित करत आहेत, अशी लव्ह जिहादची व्याख्या न्यायालयाने केली आहे.

न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे की, आलीम नावाच्या तरुणाने आनंद हे खोटे हिंदू नाव धारण करून सदर मुलीला आपल्या जाळ्यात ओढले नंतर हिंदू पद्धतीने लग्न केल्याचे चित्र उभे केले.

न्यायालयाने असेही निरीक्षण नोंदवले की, हे एका विशिष्ट धर्मातील काही अराजकवादी घटकांचे आतंरराष्ट्रीय स्वरूपाचे कारस्थान असू शकते. त्या माध्यमातून आपले वर्चस्व देशावर निर्माण करणे हा उद्देश असू शकतो.

न्यायालयाने म्हटले आहे की, सोप्या शब्दात सांगायचे झाले तर लव्ह जिहाद म्हणजेच मुस्लिम पुरुषाने मुस्लिमेतर महिलांना जाळ्यात ओढून त्यांच्याशी विवाह करणे आहे. एका धर्मातील काही अराजकवादी लोक हे कारस्थान करत आहेत, मात्र त्यामुळे तो संपूर्ण समाज बदनाम होत आहे. या लव्ह जिहाद साठी मोठ्या प्रमाणात अर्थ पुरवठा आवश्यक आहे त्यामुळे यात परकीय हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

न्यायालयाने म्हटले आहे की, कुणीही कुणाला सक्तीने धर्मांतरित करू शकत नाही. जर असे कृत्य कुणी करत असेल तर उत्तर प्रदेशच्या सक्तीने धर्मांतरण करण्याविरोधातील कायद्याचे ते उल्लंघन ठरेल.

हे ही वाचा:

रंग बदलणाऱ्या सरड्यालाही लाज वाटेल असं विशाल पाटीलचं काम!

‘गांधीजींचे खरे अनुयायी असाल तर, काँग्रेस विसर्जित केली पाहिजे’

दिल्लीत २ हजार कोटी रुपयांचे ५०० किलोहून अधिक कोकेन जप्त!

‘देशात ९० टक्के हिंदू राहतात, हिंदूंच्या हिताची काळजी घेणे गुन्हा नाही’

न्यायालयाने यासंदर्भात सावधगिरीचा इशाराही दिला की, केंद्र सरकारने याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे कारण लव्ह जिहादच्या माध्यमातून धर्मांतरण करणे, प्रेमाच्या जाळ्यात ओढणे, त्यासाठी खोटे नाव धारण करणे हे गंभीर आहे आणि याचे दुष्परिणाम भविष्यात भोगावे लागू शकतात.
न्यायालयाने त्यापुढे जाऊन असे निरीक्षण नोंदवले की, पाकिस्तान किंवा बांगलादेश यासारखी परिस्थिती निर्माण करणे हा त्यामागील उद्देश असू शकतो. त्यासाठीच गरीब, मागास जातीतील, दबलेल्या वर्गातील लोकांना लग्न किंवा नोकरीच्या आमिषाने धर्मांतरित करण्याचे प्रकार होत असावेत.
हा प्रकार २०२३चा आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या बातमीनुसार सदर पीडित मुलीने मोहम्मद आलीम आणि त्याचे वडील साबीर आलम यांच्याविरोधात तक्रार केली. त्यानुसार आनंद हे खोटे नाव धारण करून आलीमने त्या मुलीशी राधाकृष्ण मंदिरात लग्न केले आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला तसेच तिच्या नकळत फोटो आणि व्हीडिओ काढून त्याद्वारे धमकी दिली.

हे सगळे प्रकरण ज्या न्यायाधीश दिवाकर यांच्यापुढे आले त्यांनीच ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला परवानगी दिली होती आणि त्यामुळे त्यांना धमक्या येऊ लागल्या होत्या.

Exit mobile version