27 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरधर्म संस्कृती‘लव्‍ह जिहाद’च्या विरोधात अमरावतीत आवाज झाला बुलंद

‘लव्‍ह जिहाद’च्या विरोधात अमरावतीत आवाज झाला बुलंद

खासदार नवनीत राणा यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा

Google News Follow

Related

देशातील सर्व राज्यांमध्ये लव्ह जिहाद रोखण्यासाठी कायदा संमत व्हावा यासाठी आपण लोकसभेत आवाज उचलणार असल्‍याचे खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. गेल्या काही महिन्यांत देशात वाढलेल्या लव्ह जिहादच्या घटना, श्रद्धा वलकर सारख्या हत्याकांडा सारखी प्रकरणे याच निषेध करण्यासाठी खासदार नवनीत राणा यांच्या नेतृत्वाखाली अमरावतीमध्ये मोर्चा काढण्यात आला होता.

‘लव्‍ह जिहाद’च्या विरोधात हजारो महिला, तरुणी आणि नेते एकवटत हा मूकमोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयांवर काढण्यात आला होता. विविध हिंदुत्ववादी संघटना देखील यामध्ये सहभागी झाल्या होत्या. शहरातील राजकमल चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठेवण्यात आला होता. दिल्लीतील श्रद्धा वालकरसह हत्याकांड, ‘लव्ह जिहाद’चा निषेध यावेळी करण्यात आला. धर्मांतर बंदी कायदा लागू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

खासदार नवनीत राणा, आमदार प्रवीण पोटे, भाजपच्‍या जिल्‍हाध्‍यक्ष निवेदिता चौधरी यांच्‍यासह भाजप, विश्‍व हिंदू परिषद, दु्र्गा वाहिनी इत्‍यादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी बोलताना नवनीत राणा यांनी कला व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सिनेमातून केली जाणारा हिंदू देवी-देवतांची विटंबना किंवा हिंदूंच्या धार्मिक भावना दुखविणारे वक्तव्य कदापिही सहन केले जाणार नाही असे सांगितले. मोर्चेकऱ्यांनी यावेळी शासनाने देशात लव्ह जिहादविरोधी कायदा व धर्मांतर बंदी कायदा देशात लागू करावा, अशी मागणी करत आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा