देशभरात दिवाळी सणाचा उत्साह असून या दीपोत्सवातील पाचवा दिवस असलेल्या भाऊबिजेच्या सणाला काही महिलांनी सीमेवरील जवानांना ओवाळले. जम्मू- काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात स्थानिक महिलांनी सीमेवर तैनात असलेल्या जवानांना ओवाळून सणाचा आनंद द्विगुणीत केला.
भाऊ आणि बहिणींना समर्पित असलेला हा सण भावांच्या चांगल्या आणि आनंदी आयुष्याच्या शुभेच्छा देऊन साजरा केला जातो. जम्मू-काश्मीरमधील पुंछ येथील स्थानिक महिलांनी भारतीय लष्कराच्या रोमियो फोर्ससोबत भाऊबीज साजरा केला. या ठिकाणी भगिनींनी सर्व सैनिकांना टिळक लावले आणि त्यांना मिठाई खाऊ घातली. तसेच त्यांच्या पदोन्नतीसह त्यांना चांगले आयुष्य लाभो, अशा शुभेच्छा दिल्या.
हे ही वाचा:
शेहला रशीद म्हणते, काश्मीर म्हणजे गाझा नाही, श्रेय मोदी, शहांचे!
ऐश्वर्या रायबाबत वादग्रस्त विधान; पाकिस्तानी क्रिकेटपटू अब्दुल रझ्झाककडून माफी!
उबाठा सेनेत उद्धव ठाकरेंसकट सर्व सोंगाडे
सुब्रत रॉय यांनी दोन हजार रुपयांत गोरखपूरमधून व्यवसायाची सुरुवात
भारताच्या सीमेवर तैनात असलेले भारतीय सैन्याचे जवान सणासुदीला घरी जाऊ शकत नाहीत. देशाच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर असते. त्यामुळे भाऊबीजच्या दिवशी भगिनींनी ओवाळल्याने पूंछमध्ये तैनात केलेले सर्व सैनिक खूप आनंदित झाले आहेत.