झारखंडच्या ‘ज्या’ शाळांनी नियम बदलले, त्यांच्यावर होणार कारवाई

झारखंडच्या ‘ज्या’ शाळांनी नियम बदलले, त्यांच्यावर होणार कारवाई

झारखंडमधील सरकारी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांनी व्यवस्थापनाच्या दबावाखाली अनेक हिंदी शाळांना उर्दू शाळेप्रमाणे रविवार आणि शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी जाहीर केली आहे. याशिवाय काही हिंदी शाळांच्या नावासमोर उर्दू शब्द जोडण्याचे प्रकरणही समोर आले आहे. याप्रकरणी शिक्षणमंत्री जगरनाथ महतो यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये तपास करण्यास सांगितले आहे. कोणत्या जिल्ह्यात कोणत्या शाळांची नावे बदलून उर्दू शाळा करण्यात आल्या आहेत आणि कोणत्या शाळांना शुक्रवारी सुट्टी दिली जात आहे, याचा अहवाल आठवडाभरात मागवण्यात आला आहे.

अहवाल आल्यांनतर शासनाच्या नियमांविरुद्ध काम करणाऱ्या अधिकारी व शिक्षकांवरही कारवाई करण्यात येणार आहे. रविवारी शिक्षण मंत्री जगरनाथ महतो यांनी प्राथमिक शिक्षण संचालक दिलीप टोप्पो, झारखंड शिक्षण प्रकल्प परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक किरण कुमारी पासी, जामताराचे डीईओ-डीएसई अभय शंकर यांच्यासह ब्लॉक शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.

हे ही वाचा:

महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यात राजकीय भूकंप; काँग्रेसचे १० आमदार भाजपाच्या वाटेवर

पक्षप्रमुखांच्या आदेशानंतर संतोष बांगर यांना जिल्हाप्रमुख पदावरून हटवलं

१६ आमदारांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

सोबतच्या पंधरा आमदारांना उद्धव ठाकरेंचं भावनिक पत्र

शिक्षणमंत्र्यांनी प्राथमिक शिक्षण संचालक आणि जेईपीसीच्या एसपीडीला राज्यभरात किती शाळांना परवानगीशिवाय उर्दू शाळा असे नामांतरित केले आहे, याची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यात अशा किती शाळा आहेत जिथे शुक्रवारी सुट्टी असते. अशा शाळांच्या मुख्याध्यापकांसह हा अधिकार देणाऱ्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात यावे. त्यांच्या बाजूने समाधानकारक उत्तर न मिळाल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, अशा सूचना महतो यांनी दिल्या आहेत.

Exit mobile version