‘अंदमान पर्व’ विषयावर सच्चिदानंद शेवडे आणि परीक्षित शेवडे यांचे व्याख्यान

‘अंदमान पर्व’ विषयावर सच्चिदानंद शेवडे आणि परीक्षित शेवडे यांचे व्याख्यान

सुराज्य प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून त्यात २२ मे रोजी अंदमान पर्व या विषयावर व्याख्यान होणार आहे. त्यात ज्येष्ठ निरुपणकार डॉ. सच्चिदानंद शेवडे आणि त्यांचे सुपुत्र वैद्य परीक्षित शेवडे यांचे व्याख्यान होणार आहेत. अंदमानमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जन्मठेपेची शिक्षा भोगताना केलेला अपार त्याग या व्याख्यानाच्या माध्यमातून उभा करण्यात येणार आहे. हे पितापुत्र या व्याख्यानाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आपले विचार मांडणार आहेत.

चोगले कुटुंबियांचे विठ्ठल मारुती पंचायतन मंदिर, बोरिवली (प.) येथे हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी ७.१५ वाजता या व्याख्यानाला प्रारंभ होणार आहे.

याआधी शरद पोंक्षे यांनी सावरकर विचार दर्शन या विषयावर तर धनश्री लेले यांनी महाकवी सावरकर या विषयावर आपले विचार प्रकट केले होते.

हे ही वाचा:

केंद्र सरकारकडून देशवासियांना मोठा दिलासा

शरद पवारांनी ‘मिटकरीं’चे कान टोचले!

J&K बँक, बीकेसीमध्ये १०० कोटींचा झोलझपाटा…

‘नवाब मलिक सरकारमध्ये राहावे यासाठी सगळी धडपड’

 

सच्चिदानंद शेवडे यांनी इतिहास आणि क्रांतिकारक या विषयांवर भारत देशात आणि परदेशात ५००० पेक्षा जास्त व्याख्याने दिली आहेत. स्वित्झर्लंडमधील माउंट टिटिलिस या युरोपातील सर्वोच्च शिखरावर छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्यान देण्याचा अनोखा विक्रम त्यांच्या नांवावर जमा आहे. महाराष्ट्रातील क्रांतिकारकांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा होतीच, याशिवाय देशातील अन्य प्रांतांतील क्रांतिकारकांचेही प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज होते यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. ५० पुस्तकांचे लेखन त्यांनी आतापर्यंत केले असून त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर, देशकार्यात प्राणांची आहुती देणारे क्रांतिकारक, विवेकानंद, इस्लामी आक्रमण, ढोंगी पुरोगामित्व अशा अनेक विषयांवर सखोल लेखन केले आहे.

Exit mobile version